आनंद निकेतन महाविद्यालयाच्या अश्विनी राजू पुसदेकर यांची सीनियर रिसर्च फेलो (SRF) साठी निवड
सुवर्ण भारत: खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनिधी, वरोरा
चंद्रपूर:शिक्षणासोबतच रिसर्चमध्ये सुद्धा आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा हे भरीव कार्य करताना दिसून येत आहे . याचेच एक खूप सुंदर उदाहरण म्हणजे अश्विनी राजू पुसदेकर . अश्विनीची भारतातील टॉप मोस्ट मध्ये येणाऱ्या शास्त्रज्ञापैकी एक असे VNIT चे प्राध्यापक आणि विभाग प्रमुख डॉ. बाबासाहेब संकपाल यांच्या मार्गदर्शनाखाली CSIR सीनियर रिसर्च फेलो (SRF) म्हणून VNIT नागपूर येथे निवड झालेली आहे . यासाठी तिचा इंटरव्यू CSIR न्यू दिल्ली येथे झालेला होता . आनंद निकेतन महाविद्यालयातील भौतिकशास्त्र येथिल डॉ.निलेश उगेमोगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली अश्विनी राजू पुसदेकर ही विद्यार्थिनी पीएचडी (संशोधन) करीत आहे . हे करत असताना तिला जे .आर .एफ महाज्योती फेलोशिप लागू झालेली होती . या कालावधीमध्ये अश्विनीने भरघोस अशी उन्नती केली विशेष म्हणजे अश्विनी ने आत्तापर्यंत 24 रिसर्च पेपर हे एल्सवेअर ,स्प्रेंजर , स्कोपस इत्यादी जर्नल मध्ये प्रसिद्ध केले आहेत . परंतु अश्विनी यावरच थांबली नाही यासोबतच तिचे दोन पेटंट , एक डिझाईन राईट , एक बुक चाप्टर आणि एक कॉपीराईट आंतरराष्ट्रीय पातळीवर पब्लिश झालेले आहे . सोबतच नॅशनल आणि इंटरनॅशनल कॉन्फरन्स मध्ये सुद्धा तिला दोन बेस्ट पोस्टर प्रेसेंटेशन चे अवॉर्ड प्राप्त झालेले आहे . अशा या अभ्यासू अश्विनीचे चंद्रपूर जिल्ह्यातच नव्हे तर पूर्ण देशांमध्ये भरभरून कौतुक केले जात आहे .या सर्वांचे श्रेय तिने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे सर , विभाग प्रमुख डॉ. अशोक मिस्त्री सर , डॉ. मोहरील सर , मार्गदर्शक डॉ. निलेश उगेमूगे सर तसेच आई-वडील आणि तिला सपोर्ट करणाऱ्या श्रुती ढाले , अक्षय पिंपळकर ,इसरत अन्सारी , संदीप पारखी सर , डॉ. गोपाल वरुटकर सर अंकित मुंगडे , सुप्रिया मॅम व शुभम वरुटकर अशा पूर्ण टीम ला दिले आहे
