Home Breaking News • आ.सुधीर मुनगंटीवारांच्या वाढदिवसानिमित्त श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लबचे मॅरेथॉन आयोजन •...

• आ.सुधीर मुनगंटीवारांच्या वाढदिवसानिमित्त श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लबचे मॅरेथॉन आयोजन • आमदार मुनगंटीवार यांच्या प्रतिमेला दुधाने अभिषेक करून वाढदिवस केला साजरा !

143

• आ.सुधीर मुनगंटीवारांच्या वाढदिवसानिमित्त श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लबचे मॅरेथॉन
आयोजन
• आमदार मुनगंटीवार यांच्या प्रतिमेला दुधाने अभिषेक करून वाढदिवस केला साजरा !

सुवर्ण भारत: शंकर महाकाली

बल्लारपूर : महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे विद्यमान सदस्य आ. डॉ. सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्त बल्लारपूर शहरांत आज श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब तर्फे तालुका स्तरावर मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या मॅरेथॉन मध्ये शहरातील व शहराबाहेरील 500 हुन अधिक धावपटुंनी आपला सहभाग नोंदविला. या स्पर्धेचे तीन भागामध्ये रूपांतर करण्यात आले होते. ज्या मध्ये पुरुष गट, महिला गट व लहान मुलांचा वेगळा गट. या स्पर्धेत मुलींमधून प्रथम क्रमांक – कु. रुचिता नगरकर
द्वितीय क्रमांक – श्रद्धा थोरात,तृतीय क्रमांक – अभिलाषा भगत
चतुर्थ क्रमांक – रुकसाना सलमानी,पाचवा क्रमांक – प्रगती वनकर, तसेंच पुरुष गटांमध्ये, प्रथम क्रमांक – अखिल जाधव,
द्वितीय क्रमांक – भूषण अस्वले, तृतीय क्रमांक – रितिक धोत्रे,
चतुर्थ क्रमांक – पियुष गायधणे ,पाचवा क्रमांक – विवेक भगत याने पटकावीला असून लहानमुलांमध्ये प्रथम क्रमांक – लक्ष कदम,पालक यादव, द्वितीय क्रमांक – मयंक शर्मा, ख़ुशी यादव
तृतीय क्रमांक – श्रीशांक राम, पंचशीला पिंपळशेंडे यांनी पटकवीला. या स्पर्धेचे बक्षीस वितरण व प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत आंबेकर,संस्थेचे सचिव शशिकांत मुंडे, माजी सिनेट सदस्य समीर केणे, शहरातील युवा पत्रकार शंकर महाकाली भाजप माजी शहर अध्यक्ष व जेष्ठ नेते काशी सिंग, प्रकाश दोतपेल्ली प्रामुख्याने उपस्थित होते. या वेळेस प्रमुख पाहुण्यांनी स्पर्धकांना पुढच्या वाटचालीसाठी प्रोत्साहन संदेश सुद्धा दिले.

बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे विद्यमान सदस्य आ. डॉ. सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्त बल्लारपूर शहरांत आज श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब तर्फे त्यांच्या प्रतिमेची दुधाने अभिषेक करून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच कार्यक्रमाचा शेवट हा संस्थेच्या सर्व सदस्यांनी व स्पर्धेकांनी डीजेच्या तालावर नाचून आपला आनंद साजरा केला.