राज्यस्तरीय एरोबिक्स जिमनॅस्टिकस चॅम्पियन स्पर्धेत
मनिष पाटील यांना कांस्य पदक
रिपोर्टर ✍️ तालुका प्रतिनिधी राजेश येसेकर
भद्रावती : चंद्रपुर जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रातील इतिहासात अत्यंत गौरवास्पद ऐतिहासिक अशी बाब म्हणजे कि विश्वातील सर्व क्रीडा प्रकाराची जननी म्हणून ओळखले जाणाऱ्या जिमनॅस्टिकस या क्रीडा प्रकारात आमच्या चंद्रपुर जिल्ह्यातील आयुषी जिमनॅस्टिकस अकादमी, आयुध स्पोर्टस् अकादमी, अंकुर विद्या मंदिर स्कूल, आयुध निर्माणी चांदा वसाहत, भद्रावती येथील जिमनॅस्टिकस चॅम्पियन मनिष रवींद्र पाटील ( वर्ग 05, पी एम श्री केंद्रीय विद्यालय, आयुध निर्माणी चांदा ) यांनी महाराष्ट्र स्टेट एरोबिक्स जिमनॅस्टिकस चॅम्पियनशिप, श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ,अमरावती मधे कांस्य मेडल प्राप्त करून जिल्ह्यातील इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रीय एरोबिक्स जिमनॅस्टिकस चॅम्पियनशिप करीता आपली निवड सिद्ध केली आहे.
महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे उपाध्यक्ष व महाराष्ट्र अमेचुअर जिमनॅस्टिकस असोसिएशनचे अध्यक्ष आदरणिय संजय शेटे सर ( मुंबई ) तसेच एशियन एरोबिक्स जिमनॅस्टिकस युनियनचे सेक्रेटरी व महाराष्ट्र असोसिएशनचे सचिव आदरणीय प्राचार्य डॉ मकरंद जोशी सर, महाराष्ट्र राज्य शासनाचा श्री शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन्मानित,संभाजी नगर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत चंद्रपुर डिस्ट्रिक्ट अमेचुअर जिमनॅस्टिकस असोसिएशन ® शी संलग्न आयुषी जिमनॅस्टिकस अकादमी,आयुध स्पोर्टस् अकादमी,अंकुर विद्या मंदिर स्कूल, भद्रावतीच्या वतीने मान्यताप्राप्त ऑलिम्पिक जिमनॅस्टिकस खेळाच्या प्रसारासाठी नियोजनबद्ध पद्धतीने सुरू असलेल्या प्रयासास आज मास्टर मनिष रवींद्र पाटील द्वारा सुयश प्राप्त झाले आहे.
जिमनॅस्टिकस चॅम्पियन मास्टर मनिषच्या या सुयशासाठी आयुषी जिमनॅस्टिकस अकादमीचे कोच दीक्षांत रामटेके व कु.आयुषी रामटेके, कु.ऋतुजा माटे सहयोगी जिमनास्ट कु वैष्णवी जोशी, दीक्षांत सोनारकर यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
मनीष रविंद्र पाटील ला चंद्रपुर डिस्ट्रिक्ट अमेचुअर जिमनॅस्टिकस असोसिएशन चे सचिव व मुख्य कोच दुर्गराज रामटेके यांच्या सह श्री आशिष सावंत सर(मुंबई),श्री मुकेश घ्यार सर(नागपुर), श्री संजय हिरोडे सर,श्री प्रणय वैद्य सर (अमरावती), कु. प्राची पारखी, कु. अल्फिया खान (नागपुर) इत्यादी सर्व इंटरनॅशनल कोचेस सह जिमनॅस्टिक मार्गदर्शक कोच बी एल करमनकर,संजय माटे, गौतम भगत, योगेश रामटेके, संजीव सिंग, राजेश राजपुत यांचे मार्गदर्शन लाभले.
जिमनॅस्टिकस क्रीडा क्षेत्रात मनीष पाटील यांच्या या ऐतिहासिक सुयशासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी श्री अविनाश पुंड,चंद्रपुर डिस्ट्रिक्ट अमेचुअर जिमनॅस्टिकस असोसिएशन चे पदाधिकारी दुर्गराज रामटेके,आशुतोष गायनेवार, निलेश गुंडावार,अँड राजरत्न पथाडे, सौ.शितल रामटेके, आयुध निर्माणी चांदाचे संयुक्त महाप्रबंधक श्री रवी चौधरी, डेप्युटी महाप्रबंधक श्री प्रशांत सुरकर, डेप्युटी महाप्रबंधक अभय एक्का, स्पोर्ट्स सेक्रेटरी उज्वल मिश्रा, केंद्रीय विद्यालयच्या प्राचार्या सौ स्मिता विश्वकर्मा,तालुका क्रीडा अधिकारी सौ जयश्री देवकर, क्रीडा अधिकारी श्री नंदु आवारे,श्री मोरेश्वर गायकवाड, श्री संदीप युइके, विजय ढोबाळे,मार्गदर्शक श्री राजेश सोलापान, फादर पीटर वर्गिस, राकेश राय,अशोक कामडे, अतुल कोल्हे, प्राविण्य पाथर्डे,अरविंद बनकर, कैलास शेंडे,सुरेन्द्रसिंग चंदेल, सौ शुभांगी डोंगरावर, सौ प्रगती कथडे, रामु पुंडे, शीतल वालदे,उल्फत सय्यद, मनीष मत्ते,दत्ता खेडकर, विक्रांत जोशी,किशोर झाडे, गोपाल कळमकर, चिन्नी डोपाला,महेंद्र सोनारकर,किरण राजुरकर, संदीप पंधरे, अशोक बोबडे, अमोल थिटे,इत्यादी द्वारा संपुर्ण चंद्रपुर जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रात सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
