Home Breaking News विदर्भ किसान मजदूर काँग्रेस कडून मनपाच्या आयुक्तांकडे शहरातील रस्त्यांचे व चौकांचे केले...

विदर्भ किसान मजदूर काँग्रेस कडून मनपाच्या आयुक्तांकडे शहरातील रस्त्यांचे व चौकांचे केले नामकरण फलक त्वरित लावण्याची केली मागणी

234

#chandrapur

• विदर्भ किसान मजदूर काँग्रेस कडून
मनपाच्या आयुक्तांकडे शहरातील रस्त्यांचे व चौकांचे केले नामकरण फलक त्वरित लावण्याची केली मागणी

चंद्रपूर -विशेष प्रतिनिधी

विदर्भ किसान मजदुर काँग्रेस तर्फे शहर अध्यक्ष तथा माजी नगरसेवक देवेंद्र बेले, व माजी नगरसेवक अशोक नागपुरे यांनी मनपा आयुक्तांना चंद्रपूर शहरातील रस्त्यांची व चौकातील नामकरण ठराव यादी सादर केली.
मनपाने व नगरपरिषदेने ठराव केलेल्या रस्त्यांचे व चौकांचे सन १९८९ ते २०२१ पर्यंत सर्वसाधरण सभेत पारित झालेल्या चंद्रपूर शहरातील रस्त्यांचे व चौकांचे नामकरण केले आहे. या यादीची अमंलबजावणी करून त्या जागी नामकरण फलक त्वरीत लावावे..

चंद्रपुर नगर परिषद व त्यानंतर झालेल्या महानगरपालिका मध्ये नगरसेवक व पदाधिका-यांच्या मार्फत आमसभेत सन १९८९ ते २०२१ पर्यंत चंद्रपूर शहरातील रस्त्यांना व चौकांचा नामकरण करण्याचे ठराव घेण्यात आले. व नामकरणाचे ठराव सर्वानुमते पारित करण्यात आला. याची यादी चंद्रपुर शहर महानगरपालिकेकडे आहे. परंतू या यादीची अमंलबजावणी फक्त १० टक्के या प्रमाणात करण्यात आली आहे. काही ठिकाणी चौकांना व रस्त्यानां नामकरण फलक लावण्यात आले. पंरतु अजून पर्यंत ९० टक्के ठिकाणी नामकरण फलक लावण्यात आलेले नाही.
चंद्रपूर शहरातील वरोरा नाका चौकाला दिनांक २८/१२/२०१७ रोजी ठराव क्र.७७ नुसार दिक्षाभुमी चौक असे नाव देण्याचा ठराव चंद्रपूर शहर महानगर पालिकेने मंजूर केला आहे, परंतु या ठिकाणी नामकरण फलक लावण्यात आला नसल्याने परत या चौकाला दिक्षाभुमी चौक असे नामकरण करा असे काही राजकिय पक्षाच्या वतीने मागणी करण्यात आली आहे, यामुळे जनतेत संभ्रम निर्माण होत आहे.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणा-या वीरांचे नाव तसेच थोर पुरुषांचे नाव व चंद्रपूर शहरातील शहराच्या विकासात तथा समाजकार्य करणा-यांचे नाव रस्त्याला व चौकाला याअधीच देण्यात आले आहे. तरी आपण तात्काळ उपायोजना करून ज्या ठिकाणांच्या रस्त्याचे व चौकाला नामकरण केले आहे. त्या ठिकाणी नामकरण फलक लावण्यात यावे.
तसेच चंद्रपूर शहरातील रस्त्यांचे व चौकांचे नविन नाव देण्या पुर्वी जुन्या दिलेल्या ठिकाणांच्या नावात कोणतेही बदल करू नये. याची आपण दक्षता घ्यावी.असे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे
या निवेदनाची एक प्रत त्यांनी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांना दिलेली आहे.