Home Breaking News ⬜🟥ऑपरेशन सिंदूर🟥⬜

⬜🟥ऑपरेशन सिंदूर🟥⬜

88

⬜🟥ऑपरेशन सिंदूर🟥⬜

पहलगामी दहशतवाद्यांनी
क्रूर हल्ला केला हिंदूंवर
प्रत्यूत्तर म्हणुनी दिले लक्ष
ऑपरेशन सिंदूर कारवाईवर…

ऑपरेशन सिंदूर नावात
तीव्र बदला जाणवती
इतिहासातील हे अभियान
भारतीय सैन्याची महती…

दाखविले आपल्या भारतानी
हिंदू धर्म काय असते
जय श्रीराम नारा लावुनी
हल्ला जिथे तळ दिसते…

या मातृभूमीलाही अभिमान
सैन्य लढण्यास सरसावले
नाही पर्वा स्वतःच्या देहाची
कुणी आहुती देऊनी निजले….

वचन तर निभावले पण
निरपराध गेले हो प्राण
वाटे फक्त सांत्वन टिसूभर
उध्वस्त झाले आयुष्याचे रान…..

🟥सौ. शैला चिमड्यालवार
सहज सुचलं मार्गदर्शिका
🟨⬜सावली जिल्हा चंद्रपूर🟧