Home Breaking News • रुग्णांची 74 वी तुकडी विविध आजारांच्या शस्त्रक्रियेसाठी रवाना

• रुग्णांची 74 वी तुकडी विविध आजारांच्या शस्त्रक्रियेसाठी रवाना

112

• रुग्णांची 74 वी तुकडी विविध आजारांच्या शस्त्रक्रियेसाठी रवाना

सुवर्ण भारत : पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी, चंद्रपूर

घुग्घुस : आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र आणि आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार आरोग्य सेवा समिती महाराष्ट्रातर्फे ७ ऑगस्ट रोजी दुपारी या सेवा केंद्रातून आमदार देवराव भोंगळे व भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांच्या मार्गदर्शनात विविध आजारांच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णांची 74 वी तुकडी रवाना करण्यात आली.

सर्वांची मोफत शस्त्रक्रिया आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार आरोग्य सेवा समिती महाराष्ट्र करणार आहे. नुकतेच आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त घुग्घुस शहरात भव्य महाआरोग्य शिबीर पार पडले या शिबीरात रुग्णांची नि:शुल्क तपासणी करण्यात आली यातील नकोडा परिसरातील पात्र रुग्णांना विविध आजारांच्या शस्त्रक्रियेसाठी आचार्य विनोबा भावे (सावंगी मेघे) रुग्णालयात पाठविण्यात आले.

यावेळी नकोड्याचे सरपंच किरण बांदूरकर, भाजपा नेते गणेश कुटेमाटे, आकाश निभ्रड, बबलू सातपुते, इर्शाद कुरेशी, हनुमान खडसे, संदीप तेलंग आदी उपस्थित होते.