Home Breaking News चिखलगावात कौतुकास्पद कार्यक्रम – एकोप्याचा सुंदर संदेश गावकऱ्यांकडून

चिखलगावात कौतुकास्पद कार्यक्रम – एकोप्याचा सुंदर संदेश गावकऱ्यांकडून

216

चिखलगावात कौतुकास्पद कार्यक्रम – एकोप्याचा सुंदर संदेश गावकऱ्यांकडून

सुवर्ण भारत:रोशन खानकुरे

 8888203020

चिखलगाव
(ता.नागभीड,जि.चंद्रपूर)

जागतिक आदिवासी दिवसाच्या निमित्ताने चिखलगाव येथे भव्य आणि कौतुकास्पद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मोट्या गाज्या वाज्याच्या गजरात, गावातील नवयुवकांच्या उत्साही सहकार्याने, शाळेच्या शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या सक्रिय सहभागातून तसेच सर्वधर्मीय समाजाच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
कार्यक्रमाच्या एक दिवसा आधीपासूनच गावात सणासारखे वातावरण होते. पारंपरिक वेशभूषा परिधान केलेले आदिवासी बांधव, महिला आणि युवक वाज्याच्या तालावर नाचत आनंद व्यक्त करत होते. सकाळी मिरवणुकीने सुरुवात होऊन विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण भारून टाकले. मुख्य कार्यक्रमांत पारंपरिक नृत्य, गीत आणि ढोल-ताशांच्या तालावर सादरीकरणे, आदिवासी समाजाचा इतिहास, संस्कृतीचे संवर्धन आणि शिक्षणाचे महत्त्व यावर माहितीपर व्याख्याने, याशिवाय रंगीबेरंगी रांगोळ्या,
नवयुवकांनी मंच सजावट, वाहतूक व्यवस्था, पाणीपुरवठा आणि महाभोजनाची जबाबदारी कौतुकास्पद पद्धतीने पार पाडली. शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत आपल्या संस्कृतीचा अभिमान जपण्याचा संदेश दिला. सर्वधर्मीय समाजाच्या एकत्रित सहभागामुळे हा कार्यक्रम केवळ सांस्कृतिक सोहळा न राहता एकोप्याचा सुंदर संदेश देणारा ठरला. शेवटी, सर्वांनी मिळून रंगीबेरंगी रांगोळ्यांच्या सजावटीत आणि आनंदी वातावरणात सामूहिक महाभोजनाचा आस्वाद घेत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली