15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन -उत्सव तीन रंगांचा!
आभाळी आज सजला!
नतमस्तक मीं त्या सर्वांचा!
ज्यांनी भारत देश घडविला! ⬜🌸⬜आज 15ऑगस्ट आपल्या देशाचा 79 वा स्वातंत्र्य दिन! आजच्या दिवशी 15ऑगस्ट !1947 या दिवशी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. जवळ जवळ 350 वर्ष इंग्रज भारतात ठाण मांडून होते. व्यापारासाठी आलेल्या इंग्रजांनी इसविसन 1600 मध्ये भारतात इष्ट इंडिया नावाची कंपनी व्यापारासाठी म्हणून स्थापन केली आणी पुढे याच कंपनीच्या माध्यमातून भारत देशावर कब्जा मिळविला. इंग्रज एकाएकी काही शासनकर्ते बनले नाही, त्यांनी हळूहळू इथे आपली पकड मजबूत केली. येथील वैभव, श्रीमंती, अतोनात सोनं पाहून त्यांचे डोळे दिपून गेले. आणि त्यांनी येथे कुटनीतीचा वापर करणे सुरु केले.
येथील जातीवाद, उच्चणीच, अमीर गरीब असलेली दरी, या गोष्टींचा त्यांनी पुरेपूर फायदा घेतला. समाजातील अज्ञान, रूढी, परंपरा, अनिष्ट चालीरिती अशी अनेक कारणे त्यांना इथे पाय घट्ट करण्यास कारणीभूत ठरली. राज्यराज्यात सपापसात असलेली तेढ, दुष्मनी याचा इंग्रजांना फायदाच झाला. आपापसात भांडणे लावून, आपापसात लढवून आपला पुरेपूर फायदा करून घेतला. आणि ते इथले शासन कर्ते बनले. 150वर्ष शासन केलं. अनेक जाचक कायदे केले, अनेक प्रकारे जनतेचा छळ केला. देशाचं नाव घेण्याचीही उजागरी येथील जनतेला नव्हती. यातूनच मंगल पांडे, खु्दीराम बोस, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यासारखे क्रांतिकारक जन्माला आले, देशाच्या स्वातंत्र्यासाठी फासावर गेले. लोकमान्य टिळक, न्या. रानडे, वीर सावरकर, लाला लाजपाताराय, सुभाषचंद्र बोस, महातमा गांधी यांसारख्या अनेक ज्ञात, अज्ञात देशाभक्तांनी स्वातंत्र्या साठी तुरुंगावास भोगला अतोनात छळ सहन केला.या सर्वांना माझा मनाचा मुजरा,!
अशा प्रकारे असंख्य यातनानमधून देश 15 ऑगस्ट 1947ला एका देशाचे दोन देश होऊन स्वतंत्र झाला. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू होते. स्वातंत्र्यानंतर आपल्या देशात कृषी, विज्ञान, तंत्रज्ञान, आरोग्य, उद्योग, शिक्षण, साहित्य, खेळ, रस्ते, दळणवळण, प्रवासी साधने, कारखाने, मनोरंजन, सैन्य, अन्विक ऊर्जा, शास्त्रास्त्र, पाणी, दिवाबत्ती अशा सर्वच क्षेत्रात प्रगती केली आहे. जगात विकासानशील देश ते विकसित देश अशी आपल्या देशाची ओळख झाली आहे. अशा आपल्या भारत देशाची आण, बाण, शान राखायची आणि डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाचे रक्षण करण्याची संपूर्ण जबाबदारी प्रत्येक भारतीयांची आहे. ती जबाबदारी आपण सर्व मिळून पार पाडू यात. जय हिंद !
⬜सौ.संजीवनी शामसुंदर धांडे, राजुरा, जि. चंद्रपूर
