Home Breaking News *आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा* *नागरिकांनी देश...

*आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा* *नागरिकांनी देश प्रगत करण्यासाठी आपआपली कर्तव्ये निष्ठेने पार पाडावीत: विवेक बोढे*

99

• आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

• नागरिकांनी देश प्रगत करण्यासाठी आपआपली कर्तव्ये निष्ठेने पार पाडावीत: विवेक बोढे

सुवर्ण भारत: पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी, चंद्रपूर

घुग्घुस: शहरातील आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात असंख्य देशभक्त नागरिकांच्या उपस्थितीत देशाचा ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.

भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत गाऊन तिरंगा झेंड्यास सलामी देण्यात आली. अनेकांनी देशभक्तीपर गीत गायन करून वातावरण देशभक्तीमय केले. लहान मुलांनी नृत्य सादर करीत सर्वांची मने जिंकली.

*मनोगत व्यक्त करतांना भाजपाचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे म्हणाले, नागरिकांनी देश प्रगत करण्यासाठी आपआपली कर्तव्ये निष्ठेने पार पाडावीत. देश विकसित करणे आणि विकसित देश घडविण्यासाठी प्रत्येकांनी आपले कार्य निष्ठेने केले पाहिजे. समाजकारणाची दिशा पकडून सेवा, सेवा आणि फक्त्त सेवा केल्यानेच देशाची प्रगती होणार. जाती, धर्माच्या उत्सवापेक्षा १५ ऑगस्ट हा मोठा उत्सव आहे.*

यावेळी भाजपाचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे, जि.प. माजी सभापती नितुताई चौधरी, प्रयास सखी मंचच्या मार्गदर्शिका अर्चनाताई भोंगळे, अध्यक्षा किरणताई बोढे, भाजपा जिल्हा सचिव विनोद चौधरी, निरीक्षण तांड्रा, चिन्नाजी नलभोगा, पत्रकार सुरेश खडसे, सतीश बोन्डे, हेमंत पाझारे, दिनेश बांगडे, कुसुम सातपुते, लक्ष्मी नलभोगा, वैशाली ढवस, सुचिता लुटे, गणेश कुटेमाटे, इर्शाद कुरेशी, रत्नेश सिंग, सिनू रामटेके, समय्या कटकम, धनराज पारखी, सुरेंद्र जोगी, मुस्तफा शेख, अमीना बेगम, आबेदा पठाण, नाजमा कुरेशी, शिल्पा थेरे, पुष्पा रामटेके, मोमीन शेख, असगर खान, दिलीप कांबळे, विवेक तिवारी, विनोद जंजर्ला, हेमंत कुमार, राजेंद्र लुटे, सांबशीव खारकर, निरंजन नगराळे, अनिल नित, जनाबाई निमकर, सुनीता पाटील, वंदना मुळेवार व मोठया संख्येत नागरिक उपस्थित होते.