• दैनिक विदर्भ शासन वृत्तपत्र प्रतिनिधींचा परिचय मेळावा संपन्न
• मेळाव्यात प्रतिनिधींचा सन्मान!
चंद्रपूर 🟨किरण घाटे🟨
सुवर्ण भारत विदर्भ विशेष प्रतिनिधी
अंजनगाव सुर्जी येथील विश्रामगृहात नुकताच विदर्भ शासन वृत्तपत्राचा प्रतिनिधी परिचय मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला .
या आयोजित मेळाव्याला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभल्यामुळे कार्यक्रम अधिक संस्मरणीय ठरला.
मेळाव्याचे आयोजन अतिशय सुंदर पद्धतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीेसाठी
आयोजक हाजी अब्दुल रहमान, अमानउल्ला खान, सुधाकर टिपरे कुशल चौधरी, मो.सईद,मनोज मेळे, प्रेमदास तायडे तसेच मंगेश इंगळे यांचे मोलाचे योगदान ठरले.
*🟨प्रतिनिधींचा सन्मान*:🟨
या मेळाव्यात सर्व उपस्थित प्रतिनिधींना आय कार्ड, नियुक्तीपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. सदरहु उपक्रमामुळे प्रतिनिधींमध्ये आत्मीयतेची भावना अधिक दृढ झाली.
*🟨 पत्रकार गजानन देशमुख यांचे मार्गदर्शन*🟨
कार्यक्रमात वरिष्ठ पत्रकार गजानन देशमुख यांनी पत्रकारितेबद्दल उत्कृष्ट मार्गदर्शन केले. त्यांच्या अनुभवसंपन्न भाषणातून उपस्थित प्रतिनिधींना पत्रकारितेचे सामाजिक उत्तरदायित्व, प्रामाणिकता आणि वस्तुनिष्ठतेचे महत्त्व अधोरेखित झाले.
या वेळी विदर्भ शासन वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक म्हणून परविन पाचघरे तसेच उपसंपादक पदी मो.शरीफ यांची निवड करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीने वृत्तपत्राच्या कार्यक्षमतेत आणि दृष्टीकोनात नवे बळ मिळेल, असा विश्वास उपस्थित प्रतिनिधींनी आणि संपादकांनी आपल्या बोलण्यातून व्यक्त केला.
कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर सर्व उपस्थित प्रतिनिधींमध्ये आत्मीयतेचे वातावरण निर्माण झाले.भविष्यातही अशा कार्यक्रमांमधून वृत्तपत्राचे बंध अधिक दृढ होतील असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.




