• ग्रामीण युवा पत्रकार संघाच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी दीपक कटकोजवार यांची नियुक्ती!
• अनेकांनी केले कटकोजवार यांचे अभिनंदन
चंद्रपूर : किरण घाटे
चंद्रपूर संग्राम न्युज चॅनलचे कार्यकारी संपादक तथा दैनिक प्राप्ती टाइम्स या वृत्तपत्राचे जिल्हा प्रतिनिधी दीपक कटकोजवार यांची देश पातळीवरील नोंदणीकृत असलेल्या युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी राष्ट्रीय अध्यक्ष गणेशभाऊ कचकलवार यांनी नियुक्ती केली आहे.त्यांनी पत्रकार कटकोजवार यांना नियुक्तीपत्र देखील पाठविले आहे. त्यांच्या या नियुक्तीचे चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक पत्रकार बांधवांनी अभिनंदन केले असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


