• मनस्पर्शीमुळे माझ्या लिखाणाचं बळ अधिक वृध्दिंगत झालं -जेष्ठ लेखिका विजया भांगे
चंद्रपूर – किरण घाटे
चंद्रपूर : अमरावती जिल्ह्यातील पथ्रोटच्या प्रख्यात जेष्ठ लेखिका विजया भांगे यांनी आजपर्यंत विपूल प्रमाणात साहित्य लेखन केले असून त्यांना वैदर्भीय वृत्तपत्राच्या दिवाळी अंकातील कथेसाठी या पूर्वी सर्वोत्तम कथेचा पुरस्कार बहाल झाला आहे.नागपूरच्या समाजसेविका मायाताई कोसरे व अधिवक्ता मेघा धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली गत काही वर्षांपासून नियमीतपणे सुरू असलेल्या सहज सुचलं या व्हाॅट्सअप गृपवर त्या कार्यरत आहेत.त्यांनी बरेचदा या गृपवर स्तंभ लेखन केले आहे.
उत्तम लिखाणासाठी अनेक पुरस्कारांच्या मानकरी ठरलेल्या विजया भांगे ह्या एक आदर्श सेवानिवृत्त शिक्षिका आहे.त्या आता ठाण्याच्या मनस्पर्शी साहित्य परिवार गृप मधील विजयाक्षर या सदरात साप्ताहिक लिखाण करीत आहे.
ठाणे येथील मनस्पर्शी साहित्य परिवारात आजपर्यंत त्यांनी स्तंभ लेखन केले आहे.
मनस्पर्शीमुळे माझ्या लिखाणाचं बळ अधिक वृध्दिंगत झाले.त्यामुळेच आज विजयाच्या अक्षराला आश्वासक आधार मिळाला म्हणूनच “विजयाक्षर “या सदरात लिहिण्याचे आपण ठरविले आहे .अश्या शब्दात त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.आपण आपल्या लिखाणातून योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याच्या विजया भांगे या वेळी म्हणाल्या .
