Home Breaking News • महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी एका रस्ता अपघातातून सहीसलामत बचावले !...

• महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी एका रस्ता अपघातातून सहीसलामत बचावले ! • डोनी फाट्यानजीकची घटना

202

• महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी एका रस्ता अपघातातून सहीसलामत बचावले !

• डोनी फाट्यानजीकची घटना

चंद्रपूर- किरण घाटे

चंद्रपूर : चंद्रपूरच्या नियोजन भवनात आयोजित केलेल्या एका कार्यशाळेला उपस्थित राहण्यासाठी ब्रम्हपुरी वरुन येत असलेल्या महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची कार उलटण्याची दूदैवी घटना मूल नजिकच्या डोनी फाट्याजवळ काल सकाळी घडली.
या घटनेत दोन अधिकारी व काही कर्मचारी किरकोळ जखमी झाल्याचे वृत्त आहे.त्यांना तातडीने मूलच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले .उपचारानंतर त्यांना सुट्टी देण्यात आली.
या बाबत असे कळते चंद्रपूर येथील नियोजन भवनात काल गुरुवारी एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी ते चंद्रपूर कडे कारने येत होते.परंतु वाटेतच त्यांच्या वाहनाला एका ट्रकने धडक दिली त्यातच महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे हे चार चाकी वाहन पलटले.नशिब बलवत्तर होते म्हणून हे सर्व अधिकारी व कर्मचारी सही सलामत बचावले.
अधिकारी व कर्मचारी यांच्या कारला समोरासमोर धडक देणारा या घटनेतील ट्रक चालक फरार असल्याचे कळते.
घटना घडतातच या घटनेची बातमी जिल्हाभर पसरली महसूल विभागातील अनेक कर्मचारी एकमेकांना फोनकरून या अपघाताची माहिती जाणून घेत असल्याचे काल दिवसभर दिसून आले.
नायब तहसिलदार विनोद बोढे,नायब तहसिलदार महानंदा मडावी व अन्य पाच महसूल कर्मचारी या कारने कार्यशाळेसाठी चंद्रपूर कडे येत होते.