Home Breaking News गायीचा हल्ला एका महिलेचा मृत्यू तर दोन महिला गंभीर जखमी! •...

गायीचा हल्ला एका महिलेचा मृत्यू तर दोन महिला गंभीर जखमी! • पडोली येथील घटना; पोलिस स्टेशनला तक्रार दाखल! • पिडित महिलांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला नाही तर जनआंदोलन करु प्रकाश रेड्डींचा प्रशासनाला इशारा

278

• गायीचा हल्ला एका महिलेचा मृत्यू तर दोन महिला गंभीर जखमी!

• पडोली येथील घटना; पोलिस स्टेशनला तक्रार दाखल!

• पिडित महिलांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला नाही तर जनआंदोलन करु प्रकाश रेड्डींचा प्रशासनाला इशारा

Oplus_16777216
Oplus_16777216

चंद्रपूर  : किरण घाटे

चंद्रपूर : मोकाट फिरणाऱ्या एका गायीने महिलांवर हल्ला चढविण्याची घटना नुकतीच घडली .या घटनेत एका ६०वर्षीय महिलेचा मृत्यू झाला तर दोन महिला गंभीर झाल्या! सदरहु घटना चंद्रपूर नजीकच्या पडोली या गावातील इंदिरा नगर वार्डात घडली.या घटनेबाबत असे कळते कि पडोली येथील इंदिरा नगर वार्डातील बेबी बापुराव भगत ही घराशेजारी उभी असताना अचानकपणे मोकाट गायीने तिच्यावर हल्ला चढविला.त्यातच तिचा मृत्यू झाला त्या नंतर त्याच गायीने २८वर्षीय कोमल अशोक कांबळे व ३५वर्षीय सीमा अरुणकंडवर हल्ला चढवित त्यांना गंभीर जखमी केले.त्या दोघींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यापैकी नामे कोमल कांबळे यांची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्यामुळे त्यांना चंद्रपूर शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.सदरहु घटनेतील मृतक व गंभीर जखमी झालेल्या महिलांच्या कुटुंबातील परिस्थिती अत्यंत हलाखीची असून त्यांना खासगी रुग्णालयातील खर्च परवडण्यासारखा नाही.उपरोक्त घटनेची पडोली पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून या बाबतीत त्या गाय मालकांचा पोलिसांनी शोध घ्यावा व त्या पिडित महिलांचा परिवारांना योग्य न्याय द्यावा अशी त्यांची अपेक्षा आहे.सदरहु प्रकरणात योग्य चौकशी करून त्या पिडित कुटुंबियांना त्वरित न्याय मिळाला नाही तर या बाबतीत भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आंदोलन उभारु असा इशारा पडोलीचे जेष्ठ नेते प्रकाश रेड्डी यांनी आज दिला आहे.
दरम्यान ते चंद्रपूरचे जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांची येत्या सोमवारी भेट घेऊन त्यांना या घटनेबाबत एक लेखी निवेदन सादर करणार असल्याचे त्यांनी आज पडोली मुक्कामी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.