Home Breaking News • पोळ्यात संस्कृती,परंपरा आणि जल्लोषाचा सुरेख संगम ! •चंद्रपूरात दिसला...

• पोळ्यात संस्कृती,परंपरा आणि जल्लोषाचा सुरेख संगम ! •चंद्रपूरात दिसला बालगोपालांच्या चेह-यावर भरभरुन उत्साह! •पोळा उत्सवात आ.जोरगेवार व अभिनेता शक्तीवीर धीराल यांची उपस्थिती

128

• पोळ्यात संस्कृती,परंपरा आणि जल्लोषाचा सुरेख संगम !

•चंद्रपूरात दिसला बालगोपालांच्या चेह-यावर भरभरुन उत्साह!

•पोळा उत्सवात आ.जोरगेवार व अभिनेता शक्तीवीर धीराल यांची उपस्थिती

चंद्रपूर :– किरण घाटे

चंद्रपूर शहरातील इंदिरानगर परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही तान्हा पोळा उत्सव सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला.
या कार्यक्रमाचे आयोजन राधाकृष्ण सेवा समिती व भाग्यजित बहुउद्देशीय विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रपूर विधानसभेचे आ. किशोर जोरगेवार तसेच प्रख्यात अभिनेता शक्तीवर धीराल उपस्थित होते. पाहुण्यांनी आपल्या बोलण्यातून पारंपरिक पद्धतीने तान्हा पोळा साजरा करताना मुलांचा उत्साह व कष्टकरी शेतकऱ्यांच्या परंपरेबद्दलचे प्रेम या बाबत तोंडभरून कौतुक केले.

उत्सवात बालगोपालांनी सजवलेल्या छोट्या बैलगाड्या, बैल व विविध कृषी साहित्यांची शोभायात्रा काढण्यात आली. मुलांनी रंगीत वेशभूषा परिधान करून पारंपरिक गाणी, ढोल-ताशांच्या तालावर केलेल्या नृत्यामुळे या परिसरातील वातावरण अक्षरशः दुमदुमून गेले होते.
या प्रसंगी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले, “तान्हा पोळा हा शेतकऱ्यांच्या श्रमसंस्कृतीशी जोडलेला उत्सव असून मुलांमध्ये संस्कार रुजवण्याचे एक उत्तम माध्यम आहे.” तर अभिनेता शक्तीवर धीराल यांनी उपस्थित मुलांशी संवाद साधून त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करीत पारितोषिक वितरण केले.
कार्यक्रमाचे आयोजन व प्रास्ताविक जितेश कुळमेथे यांनी केले तर सूत्रसंचालन कुंदन खोब्रागडे यांनी केले.परीक्षक म्हणून कु रंजना किन्नाके, संशीता शिंदे,उमेश्वर आत्राम, व अरुणा कापटे यांनी आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली.शेवटी विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. यात प्रथम पारितोषिक नक्ष देविदास बावणे,द्वितीय पारितोषिक
वीर प्रकाश रागेलवार,तृतीय पारितोषिक युवांश प्रताप गिरिवार यांना उपस्थित आमदार व अभिनेता यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.

या उत्सवात चंद्रपूर विधानसभेचे किशोर जोरगेवार, दशरथसिंह ठाकूर, सविता दंडारे, मोरेश्वर कुरेकर , तपोष डे, अभिनेता शक्तिवीर धीराल, नंदु रहांगडाले, महेश चहारे, विठ्ठल धनरे सिद्धार्थ मेश्राम, एकनाथ मोहितकर, परशुराम चव्हाण, प्रवीण पंचबुधे, सुरेश मुळे, दिलीप साहू, मुकेश पुरळकर, संतोष भंडारवार, धनराज ताडाम, गणेश ईसंनकर, वैभव अंबाडे, विजय देशपांडे, रूपेश मुलका वार,विजय पाटील, मनोज गणवीर, आशिष भिवगडे, लक्ष्मण शर्मा, अजय मेश्राम, गजानन शेंडे,संदीप पाटणकर, सचिन जीवतोडे, प्रसन्ना भद्रा, शंकर मिस्त्री,गौतम देवनाथ सहभागी झाले होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांचे योगदान मोलाचे ठरले.