Home Breaking News #Chandrapur • चंद्रपूर जिल्ह्यात अजूनही बालविवाह परंपरा कायम

#Chandrapur • चंद्रपूर जिल्ह्यात अजूनही बालविवाह परंपरा कायम

58

#Chandrapur
• चंद्रपूर जिल्ह्यात अजूनही बालविवाह परंपरा कायम

सुवर्ण भारत:पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी, चंद्रपूर

चंद्रपूर जिल्ह्यात सावली तालुका पाथरी प्रभागातील. गावात आणि भद्रावती तालुक्यातील गावात सातत्याने तीन बालविवाह थांबविण्याला रुदय संथा असेस टू जस्टीस फॉर चिल्ड्रेन प्रकल्पच्या क्षेत्रीय अधिकारी शशिकांत मोकाशे सोनम लाडे, रश्मी भोयर यांना यश.
गोपनीय सूत्रांकडून प्राप्त माहिती च्या आधारे बालिकेच्या कुटुंबाला भेट घेण्यात आली त्याप्रसंगी गावचे सरपंच, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका आशा ताई यांच्या समक्ष बालविवाह त्याचेपासून होणारे नुकसान , बालविवाह घडून आला तर काय शिक्षा आणि द्रव्य दंड यावर मार्गदर्शन करून त्यांना सर्वांच्या सही ने सूचना पत्र देण्यात आले. व बालिका बालकल्याण समिती समोर हजार करणेस माहिती देण्यात आली सोबत समंधित पोलीस स्टेशन येथे डायरी एन्ट्री घेऊन बालविवाह कार्यक्रमाल पूर्ण विराम देण्यात आला. प्रत्येक महिन्यात एक दोन बालविवाह चंद्रपूर जिल्ह्यात होत आहेत सोबतच अल्प वईन बालिका आई वडील गावचे मोठे या सर्वाना न जुमानता सरळ मुलांचे घरी जाऊन राहतात पालकांनी या बाबत जागृत राहून संबंधित यंत्रणे कडे माहिती दिल्यास अश्या प्रकरणाला आळा बसेल व त्या मुळे कायद्या बाबत वचक बसेल . समाजाला अजून जनजागृतीतिची आवश्यकता आहे. या सर्व प्रकरणात जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी मीनाक्षी भस्मे रुदय संथा संचलक काशिनाथ देवगडे यांच्या मार्गदर्शनात क्षेत्रीय अधिकारी शशिकांत मोकाशे, सोनम लाडे मुलं, रश्मी भोयर भद्रावती यांनी केले.