Home Breaking News • रमेश ददगाल यांचा 75 वा वाढदिवस व अमृत महोत्सव सोहळा थाटात...

• रमेश ददगाल यांचा 75 वा वाढदिवस व अमृत महोत्सव सोहळा थाटात संपन्न! • हाॅटेल राजवाडा येथील कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती!

226

• रमेश ददगाल यांचा 75 वा वाढदिवस व अमृत महोत्सव सोहळा थाटात संपन्न!

• हाॅटेल राजवाडा येथील कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती!

चंद्रपूर : प्रियंका गायकवाड

चंद्रपूर शहरातच नव्हे तर अख्खा विदर्भात सामाजिक क्षेत्रात सदैव अग्रेसर असणारे रमेश भिकुसाव ददगाल यांचा 75 वा वाढदिवस व अमृत महोत्सव स्थानिक राजवाडा हाँटेलमध्ये रविवारी सायंकाळी थाटात उत्साहात व आनंदात साजरा झाला.या वेळी कार्यक्रमाला विदर्भातील सामाजिक, कला ,साहित्य ,क्रीडा ,संगित, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळींची उपस्थिती लाभली होती.
दरम्यान चंद्रपूरचे विद्यमान आमदार किशोर जोरगेवार यांनी समाजसेवक रमेश ददगाल यांना वाढदिवसाच्या एका संदेशातून शुभेच्छा व शुभकामना दिल्या होत्या.
आयोजित सोहळ्याला चंद्रपूरचे सुभाष कासमगट्टूवार,मुक्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा मंजूश्री कासमगट्टूवार, दिनेश राठोड, संजय चाफले ,विजय चंदावार , बबनराव धर्मपुरीवार, महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे, किरणदिप व्हाॅट्सअप गृपच्या मुख्य मार्गदर्शिका अधिवक्ता अंजली गुंडावार, अपर्णा चिडे, सुवर्णा लोखंडे, मनस्वी बावणे, अनुष्का गुंडावार यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.उपरोक्त कार्यक्रमाचे आयोजन अतुल मावळे,मेघा मावळे व ददगाल परिवार तर्फे करण्यात आले होते.
याच कार्यक्रमात मूल जानाळा येथील डॉक्टर सखाराम कुचीनकर स्वातंत्र्य संग्राम सैनिक बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष मायाताई कोसरे यांचा भव्य सत्कार करण्यात आला.

हा माझा सत्कार नसून महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या सर्व कर्तृत्ववान महिला व नवोदित सदस्यांचा सत्कार असल्याची भावनिक प्रतिक्रिया मायाताई कोसरे यांनी दिली.
अनेकांच्या सदैव स्मरणात राहील असा हा भव्य सत्कार सोहळा थाटात पार पडला.