Home Breaking News #Chandrapur • शासकीय विश्रामगृहात पार पडली बहुजन समाज पार्टीची जिल्हा बैठक !...

#Chandrapur • शासकीय विश्रामगृहात पार पडली बहुजन समाज पार्टीची जिल्हा बैठक ! • बैठकीला पार्टीचे अनेक पदाधिकारी उपस्थित!

203

#Chandrapur 
• शासकीय विश्रामगृहात पार पडली बहुजन समाज पार्टीची जिल्हा बैठक !

• बैठकीला पार्टीचे अनेक पदाधिकारी उपस्थित!

सुवर्ण भारत : किरण घाटे
विदर्भ विशेष प्रतिनीधी

चंद्रपूर : बहुजन समाज पार्टी जिल्हा चंद्रपूर व विधानसभा व शहर पदाधिकारी यांची बैठक दि. २७ ऑगस्ट बुधवारला दुपारी 1.00 वाजता स्थानिक शासकीय विश्रामगृात पार पडली. सदरहु बैठकीला बहुजन समाज पार्टीचे महेंद्र मकेश्वर रत्नाकर साठे धर्मेश निकोसे, राजेश ब्राम्हणे मिलिंद शेंडे रामराव नन्नावरे, पांडुरंग तुमराम नंदु खोब्रागडे, डॉ विश्वनाथ लाडे, सुभाष पेटकर संतोष साखरकर , मनोहर बाम्बोडे उपस्थित होते. या शिवाय विधानसभेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.  या जिल्हा बैठकीत महाराष्ट्र राज्य झोन बैठकचा अहवाल सादर करण्यात आला
दिनांक  31अगस्त 2025 मुंबईच्या कार्यक्रमाची चर्चा करून निवडक पदाधिकारी मुंबईला जाण्याचे ठरविण्यात आले.जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद निवडणूक बाबत महत्वाच्या सुचना करण्यात आल्या.
जिल्हा पदाधिकारी दौरा सेक्टर बुथ वर – कैडर कैम्प व बैठकीचे आयोजन करण्याचे ठरले. जिल्हा तालुका व शहर स्तरावर एकाच दिवशी व वेळेवर निवेदन देण्याचे निश्चित करण्यात आले. उपरोक्त सर्व विषयांवर सविस्तर चर्चा झाली .