गोल पुलिया रस्ता सुरळीत करा -बल्हारपूर शहर काँग्रेस कमेटीची मागणी !
चंद्रपूर- किरण घाटे
बल्लारपूर:महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी बल्हारपूरचे सचिव घनश्याम मूलचंदानी यांच्या मार्गदर्शनाखाली व शहर काँग्रेस कामेटीचे अध्यक्ष देवेंद्र आर्य यांच्या नेतृत्वाखाली आज एक लेखी निवेदन नगर परिषदेला सादर करण्यात आले.
गोल पुलिया रस्त्यावरील ये-जा करणा-या नागरिकांच्या तसेच वाहनचालकांच्या समस्या सोडवण्यासाठी नगरपरिषदेने तातडीने प्रयत्न करावे असे बल्लारपूरचे मुख्याधिकारी विशाल वाघ यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
गोल पूलिया विस्तारीकरणाचे कार्य रेल्वे विभागाकडुन मागील सहा महिन्यापासून सुरु आहे. या कार्यामुळे गोल पुलिया मधून ये-जा करणा-या नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
अनेक वेळा नागरिकांनी तक्रारी करून देखील रेल्वे विभागाच्या वतीने दिरंगाई करण्यात येत आहे.
गणेशोत्सव दरम्यान या मार्गावर नागरिकांची ये जा वाढली असून रेल्वे विभागातर्फे गोल पूलियाच्या एका बाजूने बांधकामाच्या नावावर अर्धा रास्ता अडवून ठेवल्यामूळे नागरिकांना तसेच वाहन चालकांना बराच त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वे विभाग, महसूल विभाग तसेच पोलिस प्रशासनाने संयुक्तिकरित्या बैठक लावून या समस्येवर कायमस्वरूपीं तोडगा काढावा अशी मागणी करण्यात आली.
निवेदन देताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे सचिव घनश्याम मूलचंदानी, शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष देवेंद्र आर्य, माजी नगराध्यक्षा छाया मडावी, माजी नगरसेवक भास्कर माकोडे, आनंद कटारे, नरसिंह रेब्बावर, लखपती घुगलोट यांच्यासह काँग्रेस पक्षाचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


