• डोलारा तलाव ओव्हरफ्लो झाल्याने जलमय होऊन नारिकाच्या घरात पाणी शिरले
• नगरपरिषद प्रशासनाला माहित असतांना सुद्धा सुस्त प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा नागरिकांचा आरोप
भद्रावती तालुका प्रतिनिधी ✍️ राजेश येसेकर
भद्रावती : शहरातील डोलारा तलाव ओव्हरफ्लो झाल्याने डोलारा प्रभागातील तलावाच्या आजु बाजुचा परिसर जलमय झाल्याने. अनेकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे घरितील सामान, अनाज,कागदपत्रे खराब झाल्याने येथील नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या परिस्थितीची माहिती शिवसेनेचे लोकसभा संघटक मुकेश जिवतोडे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी करुन त्यांनी स्वखर्चाने डिझेल उपलब्ध करून दिल्याने मोटर पंपाद्वारे तलावाती पाणी काढण्यात आल्याने स्थानिकांना थोडा दिलासा मिळाला.
दरवर्षी हा तलाव ओव्हरफ्लो होत असल्याची माहिती नगरपरिषद भद्रावती प्रशासनाला माहित असताना सुद्धा सुस्त प्रशासनाने दुर्लक्ष केले. या परिसरातील नागरीकांनी वारंवार निवेदन करुनही आवश्यक पाऊले उचलली गेली नाही.
प्रशासन या घटनेचे काहीच सोयर- सुतक नसल्यासारखं उलट त्यांना तुम्हाला येथे घरे बांधायला आम्ही सांगितले काय? असे उलट उत्तरे मिळते. मग या पिडित जनतेने जायचे कुणाकडे असाही प्रश्न नागरिकांना पडला आहे.
नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनावर नाराजी व्यक्त करताना मुकेश जिवतोडे यांच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी जिवतोडे यांनी तहसीलदाराना नुक्सानग़्रस्ताना त्वरित मदत देण्याची मागणी केली. तसेच हलगर्जीपणा केलेल्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाही करण्यात येणार असल्याचे दम दिला.
यावेळी नगरपरिषदचे माजी उपनगराध्यक्ष प्रफुल्ल चटकी, नशिवसेना शहर प्रमुख पप्पू सारवान, माजी नगरसेवक चंदु खारकर, प्रतिभा सोनटक्के, प्रमोद गेडाम, युवासेना माजी उपजिल्हा प्रमुख महेश जिवतोडे, यांच्यासह मोठ्या संख्येने नागरीक उपस्थित होते.


