• चंद्रपूरातील ददगाल व मावळे परिवारांच्या वतीने
• समाजसेविका मायाताई कोसरे या़ंचा भव्य सत्कार!
चंद्रपूर : किरण घाटे
नागपूरच्या सुपरिचित समाजसेविका, योगशिक्षिका, महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं महिला व्हाॅट्सअप गृपच्या मुख्य मार्गदर्शिका तथा डॉ.सखाराम कुचीनकर स्वातंत्र्य संग्राम सैनिक बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापक- अध्यक्ष मायाताई कोसरे यांचा चंद्रपूर शहरातील ददगाल व मावळे परिवारांच्या वतीने नुकताच भव्य सत्कार करण्यात आला.
सामाजिक कार्यात नेहमीच मायाताई कोसरे यांचे योगदान मोलाचे ठरले आहे.
इतकेच नाही तर त्यांचे शहरातील अनेक सामाजिक व शैक्षणिक संस्थेंशी निकटचे संबंध राहिले आहे .
शहरातील ताडोबा तुकुम मार्गावरील हाँटेल राजवाडा येथे पार पडलेल्या एका भव्य सत्कार कार्यक्रमाला प्रामुख्याने रमेश ददगाल,अतुल मावळे,मेघा मावळे,नायब तहसिलदार प्रविण चिडे, अपर्णा चिडे, मनस्वी बावणे, अधिवक्ता अंजली गुंडावार, सुवर्णा लोखंडे, अनुष्का गुंडावार या शिवाय
ददगाल ,मावळे परिवारातील सदस्यगण व सामाजिक ,शैक्षणिक क्रीडा, साहित्यिक व संगित क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी प्रामुख्याने उपस्थित होती.


