• चंद्रपूरात जीर्ण इमारतीचा भाग कोसळला
• मनिषा नावाची महिला जखमी
• जटपूरा गेट जवळील घटना!
चंद्रपूर : किरण घाटे
चंद्रपूर :चंद्रपूरच्या मुख्य मार्गावरील स्थानिक जटपूरा गेट परिसरातील एका जीर्ण इमारतीचा काही भाग आज गुरुवारी सकाळी अकस्माक रित्या कोसळल्याची घटना घडली.
दरम्यान या घटनेमुळे एक पन्नास वर्षीय महिला जखमी झाल्याचे वृत्त आहे.त्या महिलेचे नाव मनिषा असल्याचे सांगितल्या जाते.
सदरहू घटनेतील महिलेच्या हातापायाला इजा पोहचली आहे.
ही इमारत जुनी असून ह्या इमारतीला पन्नास वर्षा पेक्षा अधिक कालावधी झाल्याची चर्चा या परिसरात ऐकायला मिळाली.
घटनेची माहिती गावभर पसरताच घटनास्थळी लोकांची गर्दी झाली होती.या इमारती बाबत जटपूरा प्रभागातील मनपाच्या एका माजी नगर सेविकेने वारंवार मनपाकडे पाठपुरावा केला होता.पण त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही.
भविष्यात अश्या दुर्घटना घडू नये यासाठी त्यांचे प्रयत्न होते.शेवटी आज या जीर्ण इमारतीचा काही भाग कोसळला.दुपारी ४ वाजेपर्यंत
घटनास्थळी मलबा हटविण्याचे काम सुरू असल्याचे दिसून आले.
शहरातील अश्या जुन्या इमारती कडे मनपाने लक्ष पूरवावे जेणेकरून भविष्यात अश्या घटना घडणार नाही.अशी अपेक्षा चंद्रपूरकरांनी व्यक्त केली आहे.





