Home Breaking News #Ballarpur • बल्लारपूरात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने स्वच्छता अभियान!

#Ballarpur • बल्लारपूरात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने स्वच्छता अभियान!

100

#Ballarpur
• बल्लारपूरात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने स्वच्छता अभियान!

सुवर्ण भारत: किरण घाटे
विदर्भ विशेष प्रतिनीधी

बल्लारपूर : बल्लारपूर येथील गोंड राजा की समाधी, शिवाजी वार्ड,येथे दि.१८ सप्टेंबरला सकाळी ११:०० वाजता
आमदार डॉ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रेरणेतून व भारतीय जनता पार्टी, बल्लारपूर शहर आणि महिला मोर्चा यांच्या संयुक्त पुढाकाराने, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवस पखवाडा उत्सव अंतर्गत एक भव्य स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले होते.

“परिसर स्वच्छतेतून सामाजिक जबाबदारीची जाणीव” या ध्येयाने प्रेरित होऊन, गोंड राजा की समाधी परिसरात स्वच्छता करण्यात आली.

कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून माजी वन विभाग महामंडळाचे अध्यक्ष चंदन सिंह चंदेल,भारतीय जनता पार्टी चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष हरीश भैया शर्मा भारतीय जनता पार्टी बल्लारपूर शहरअध्यक्ष ॲड .रणंजय सिंह होतें
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी
महिला मोर्चा अध्यक्षा वैशाली जोशी यांच्यासह रेनुकाताई दूधे, आरती अक्केवार, कांता ढोके, वर्षा सुन्चुवर,सारिका कनकम, जयश्री मोहुर्ले, सुवर्ण भटारकर, बेबी केशकर,श्रावंती इसम्पाली, गुलशन खान उत्तरा सोंत्ताके, सालू कुमहरे, श्रीमती सय्यदा,उन्नती टेकाडे, सुनीता निवाळकर, रेखा चंदाले, प्रज्ञा शेंडे, कुंती कश्यप, सरोज गोस्वामी, सोशल मीडिया प्रमुख प्रियांका शेंडे या शिवाय सर्व ८९ महिला बूथ समिती सदस्य व पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले. सदरहू स्वच्छता मोहिमेमुळे परिसरात सौंदर्य आणि स्वच्छतेसह नागरिकांमध्ये सामाजिक जबाबदारीबाबत जागरूकता निर्माण झाली.हे विशेष!