Home Breaking News बंजारा समाजाला आदिवासी समाजात समाविष्ट करण्यास आदिवासींचा तीव्र विरोध!

बंजारा समाजाला आदिवासी समाजात समाविष्ट करण्यास आदिवासींचा तीव्र विरोध!

97

बंजारा समाजाला आदिवासी समाजात समाविष्ट करण्यास आदिवासींचा तीव्र विरोध!

सुवर्ण भारत – किरण घाटे : विदर्भ विशेष प्रतिनीधी

चंद्रपूर : नागभीड येथे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली शाखा नागभीडच्या वतीने तडफदार युवा नेते सुधीर राजगडकर यांचे नेतृत्वात एक दिवसीय धरणे आंदोलन दि. 23 सप्टेंबर 2025 ला नागभीड तहसील कार्यालयासमोर करण्यात आले .
यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागभीड तहसीलदार यांचे मार्फत निवेदन पाठविण्यात आले .
बंजारा समाजाला एका जातीसाठी तीन टक्के आरक्षण असून 45 जमाती असलेल्या आणि सात टक्के आरक्षण असलेल्या समाजात बंजारा समाज का घुसू पाहत आहे? यावर टीकाटिप्पणी करण्यात आली,वेळ पडल्यास जिल्हा, तालुका स्तरावर मोर्चे काढण्यात येईल असा इशारा निदर्शनातून देण्यात आला .यावेळी प्रदेश महासचिव केशवराव तिराणिक , चंद्रपूर जिल्हाध्यक्ष जनार्धन गेडाम, जिल्हा कार्याध्यक्ष आनंद तिरानकर शहराध्यक्ष अरविंद परचाके , जिल्हा उपाध्यक्ष अशोक आलाम , टी. पी .मेश्राम व समाज बांधव मोठ्या संख्येंने उपस्थित होते