Home Breaking News • सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे व समाजसेवक दत्तात्रय समर्थ यांना...

• सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे व समाजसेवक दत्तात्रय समर्थ यांना मुल उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे नोटीस! • जानाळा येथील भुतेश्वर महादेव मंदिराचे नासधूस प्रकरण • श्रीलता व तिरुपती कटकटीच्या विरुद्ध केली होती कोसरे व समर्थ यांनी तक्रार दाखल ! • मुल पोलिस स्टेशनलाही दिली होती या प्रकरणाची माहिती!

120

• सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे व समाजसेवक दत्तात्रय समर्थ यांना मुल उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे नोटीस!

• जानाळा येथील भुतेश्वर महादेव मंदिराचे नासधूस प्रकरण
• श्रीलता व तिरुपती कटकटीच्या विरुद्ध केली होती कोसरे व समर्थ
यांनी तक्रार दाखल !
• मुल पोलिस स्टेशनलाही दिली होती या प्रकरणाची माहिती!

मुल (चंद्रपूर) : किरण घाटे विशेष प्रतिनिधी

चंद्रपूर जिल्ह्याच्या मुल तालुक्यातील जानाळा येथील भुतेश्वर महादेव मंदिराच्या नासधूस प्रकरणात चौकशी आरंभ झाली असून दरम्यान या प्रकरणात संबंधित गावच्या पटवारी व मंडळ अधिका-यांनी तहसिलदार मुल यांना आपला चौकशी अहवाल सादर केला असल्याचे समजते.
मंदिर नासधूस प्रकरणाची माहिती होताच जानाळा येथील मुळ रहिवाशी असलेल्या मायाताई कोसरे यांनी लगेच मुल पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली असल्याचे कळते .त्या नंतर त्यांनी चंद्रपूरचे जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठांकडे लेखी तक्रार सादर केली.चौकशीला विलंब होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी मुल येथील समाजसेवक दत्तात्रय समर्थ यांची भेट घेत त्यांना या प्रकरणाची माहिती दिली.
समर्थ यांनी कुठलाही वेळेचा विलंब न लावता थेट वरिष्ठांकडे आपल्या. संघटनेच्या माध्यमातून लेखी तक्रार दाखल करुन सतत या प्रकरणाचा पाठपुरावा पुरावा केला .
याच अनुषंगाने उद्या शुक्रवार दि.३ऑक्टोंबरला मूलचे उपविभागीय अधिकारी यांनी या प्रकरणाच्या संदर्भात कोसरे व समर्थ यांना आपले म्हणणे मांडण्यासाठी दुपारी ११ वाजता उपविभागीय कार्यालयात हजर राहण्याचे नोटीस बजावले आहे.
मायाताई कोसरे यांची जानाळा येथे शेतजमीन होती.ही शेतजमीन भंडारा येथील श्रीलता कटकटी व तिरुपती क्रिष्टया कटकटी यांना विकली होती.विक्री दरम्यान या शेतजमीनी मधील अस्तित्वात असलेले भुतेश्वर महादेव मंदिर व काही जमीन माझ्या ताब्यात राहील असे बक्षीस पत्र कोसरे यांनी १००रुपयांच्या स्टॅंप पेपरवर श्रीलता व तिरुपती कटकटी यांचे कडून लिहुन घेतले होते.त्यावर साक्षीदारांच्या स्वाक्षऱ्या असल्याचे समर्थ यांनी सांगितले.सध्या मायाताई कोसरे ह्या सध्या नागपूर मुक्कामी राहात असून उपरोक्त मंदिराची देखरेख व अधूनमधून मंदिरात पुजा अर्चना करीत असतात.महाशिवरात्री व अन्य सणासुदीच्या दिवसांत कोसरे ह्या मंदिरात पूजेसाठी येत असतात.
अनेक वर्षांपासून हे मंदिर असून अनेक भाविक श्रद्धेने या मंदिरात दर्शनासाठी येत असतात.
महाशिवरात्रीला या मंदिरात महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असल्याचे तेथील गावकरी मंडळींने सांगितले.
अनेकांचे श्रध्दास्थान असलेल्या या भुतेश्वर महादेव मंदिरात आपणही अधुन मधुन दर्शनासाठी जात असल्याचे चंद्रपूर निवासी जेष्ठ
योगशिक्षक रमेश ददगाल यांनी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उपराजधानी नागपूरच्या योगशिक्षिका तथा समाजसेविका मायाताई कोसरे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होवू शकला नाही .