Home Breaking News #Varora • वरोरा – माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अलीं यांचा अनेकांच्या...

#Varora • वरोरा – माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अलीं यांचा अनेकांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश

72

#Varora
• वरोरा – माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अलीं  अनेकांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश

सुवर्ण भारत : खेमचंद नेरकर  प्रतिनीधी, वरोरा

#वरोरा( #चंद्रपूर) : नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष, भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हा सचिव तसेच भाजप अल्पसंख्यक आघाडीचे माजी प्रदेश उपाध्यक्ष अहेतेशाम अली यांनी आपल्या समर्थकांसोबत काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत २१००० पेक्षा जास्त मते घेऊन अहेतेशाम अली यांनी आपल्या जनाधाराची ओळख करुन दिली व वरोरा-भद्रावती विधानसभेत त्यांनी आपले नेतृत्व कौशल्य सिद्ध केले. एन.एस.यु.आय.युवक काँग्रेस माध्यमातून राजकारणात आलेले अहेतेशाम अली काँग्रेसचे वरोरा शहर अध्यक्ष असतांना माजी मंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री स्व.संजयबाबू देवतळे यांच्या सोबत २०१४ ला भाजप मध्ये प्रवेश केला होता. देवतळेंचे ते कट्टर समर्थक होते .गेली १० वर्षे भाजप मध्ये होते. ते २०१६ च्या वरोरा न.प. निवडणुकीत भाजपच्या चिन्हावर जनतेतून थेट नगराध्यक्ष म्हणून जिल्ह्यात सर्वात जास्त मतांनी निवडून आले होते .
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी, खासदार प्रियंका गांधी, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनदादा सपकाळ
यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन व त्यांच्या कार्याने प्रभावित होऊन चंद्रपूर लोकसभेच्या सक्रिय व धाडसी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या सर्वसमावेशक नेतृत्वात अहेतेशाम अली यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करून लोकशाही वाचविण्याच्या या लढाईत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. आज नागपूर येथील प्रेस क्लब येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आपल्या कार्यकर्त्यांसह त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
हा प्रवेश सोहळा नागपूर मुक्कामी पार पडला.
पक्षप्रवेश सोहळ्यात तुळश्रीराम श्रीरामे, दादापाटील झाडे, अशरफ खान ,बंडूभाऊ लभाने , सादिक अली,शाहिद अली, धर्मेंद्र हवेलीकर,अनिल खडके , मारोती झाडे ,गणेश जोगी ,जयंत चंदनखेडे,, सुभाष वाटकर ,चंद्रकला मते ,जितु कांबळे, गणेश बादकी ,सुधाकर कुंकुले, लक्ष्मण नेहारे, संदीप विधाते,सुनील बिंजवे, आतिश बोरा, कादर शेख,सुनील हलमारे,पवन वरघणे, बाबू शेख, हरिशचंद्र चांभारे, इमरान शेख,पवन डांगरे नागरी,सुनील गेडाम,योगेश फुलझले वसीम शेख,रवी पवार,आदेश मेश्राम, रमेश मते,फिरोज शेख,परवेज शेख,अरविंद खोकले, साबीर शेख,लेखू केशवाणी,विजय धोपटे,विजय लांबट,पंकज शेंडे,अनिता शाह, सीमा वाकडे,राधा पर्बते, सावी भगत, निलोफर शेख यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
या प्रवेशाने वरोरा-भद्रावती सह चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला फायदा होणार असून खासदार प्रतिभा धानोरकर यांचे हात अधिक बळकट होणार असल्याने जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.