# Nagbhid
• गिरगाव येथे शस्रपुजन आणि विजयादशमी उत्सव साजरा
सुवर्ण भारत: निरंजन बोरकर
तालुका प्रतिनिधी, नागभिड
नागभिड तालुक्यातील गिरगाव येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गिरगाव मंडल चा विजयादशमी तथा शस्रपुजन उत्सवाचे आयोजन ४ आक्टोंबर शनिवार ला सांस्कृतिक सभागृहसमोरील मैदानात करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख अध्यक्ष म्हणून गिरगाव येथील विनोद वसंतरावजी बोरकर ( अध्यक्ष श्री लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था गिरगाव) उपस्थित होते.याप्रसंगी मंचावर सिंदेवाही तालुका संघचालक ईश्वरजी धारने, प्रमुख वक्ते म्हणून उमरेड जिल्हा महविद्यालय विद्यार्थी प्रमुख श्री लक्ष्मीकांत प्रकाशराव कारिंगवार, गिरगाव मंडल सहकार्यवाह आकाशजी थोडे उपस्थित होते. सायंकाळी पाच वाजता संपूर्ण गावातून स्वंयसेवकांचे पथसंचलन काढण्यात आले. पाऊस येत असतांना सुध्दा १८५ स्वयंसेवक पुर्ण गणवेशात होते. त्यामुळे परिसरात पथसंचलन आकर्षण ठरले. त्यानंतर महात्मा गांधी चौकात पथसंचलनाचा समारोप करण्यात आला. सहा वाजता शस्त्रपूजन तथा विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी गिरगाव शाखा कार्यवाह निरंजन बोरकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविकतेत संघ स्थापना आणि उदिष्टांबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन तालुका शारीरिक प्रमुख देवेंद्रजी बोरकर यांनी केले. सांघिक आणि वैयक्तिक गित दयानंदजी बोरकर सर सुभाषित लिनेश बोरकर,अमृतवचन निकूंज बोरकर यांनी सादर केले. शारीरिक कार्यक्रमात सुर्य नमस्कार, योगासने, व्यायामयोग,दंडक्रमीका, यांची प्रात्यक्षिके घेण्यात आली. कार्यक्रमाला गाव परिसरातील नागरिक स्त्री पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
