शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जिवती येथे वंदे मातरम गीताचे सामूहिक गायन कार्यक्रम आयोजित
सुवर्ण भारत :कृष्णा चव्हाण
जिवती : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास विभागाच्या निर्देशानुसार जिवती येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शुक्रवारी वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्याने सार्ध शताब्दी निमित्ताने वंदे मातरम या गीताचे सामूहिक गायन करण्यात आले. स्वातंत्र्य आंदोलनात वंदे मातरम् हा अतिशय लोकप्रिय असा जयघोष होता. कोणत्याही मोर्चामध्ये ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदेमातरम्’ हे जयघोष असायचे. हा प्रेरणादायी जयघोश करून अनेक क्रांतिकारक इंग्रजांचे अत्याचार सहन करत वंदे मातरमचा जयघोष करत फासावर गेले. याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून पोलीस स्टेशन जिवतीचे ठाणेदार जाधव तर प्रा डॉ. पांडुरंग सावंत यांनी मुख्य मार्गदर्शक म्हणून वंदे मातरम गीताबद्दल विस्तृत मार्गदर्शन केले तसेच प्रामुख्याने उपस्थित तहसील कार्यालय जिवती येथील नायब तहसीलदार शिल यांनी अध्यक्ष स्थान भूषवले. सदर उत्सवात संत थॉमस इंग्लिश मीडियम स्कूल, लालीबाई माध्यमिक आश्रम शाळा तसेच गोंडवाना महाविद्यालय जीवती येथील विद्यार्थी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते तसेच संस्थेचे घ्यार, शेंडे, खांडेकर बनसोड , मलिक ढवळे सर,दीपा मॅडम , सारिका मॅडम,चव्हाण, पवार, देवरवाड सर तसेच पट्टेवाले यांचे सूत्रसंचालन व जेवाले सर यांचे आभार तसेच प्राचार्य वैभव बोनगीरवार सर यांच्या मार्गदर्शनात हा गीत गायण सोहळा मोठ्या देशभक्तीने उत्साहाने संपन्न झाला.

