Home Breaking News • किरण साळवी यांनी घेतली सहज सुचलंच्या मुख्य संयोजिका रंज्जू मोडक यांची...

• किरण साळवी यांनी घेतली सहज सुचलंच्या मुख्य संयोजिका रंज्जू मोडक यांची भेट!

95

• किरण साळवी यांनी घेतली सहज सुचलंच्या मुख्य संयोजिका रंज्जू मोडक यांची भेट!

चंद्रपूर -🟪 किरण घाटे 🟧

चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भद्रावती येथील व्हॅर्चुअस मल्टीपर्पज सोसायटीच्या संस्थापक अध्यक्ष कु.किरण साळवी यांनी आज रविवारी दुपारी चंद्रपूरच्या महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या मुख्य संयोजिका रंज्जू दिलीप मोडक यांची भेट घेतली.या वेळी महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या शहरातील काही सदस्या उपस्थित होत्या.गेल्या सहा महिन्यांनंतर साळवी यांची मोडक यांच्या निवासस्थानी ही दुसरी भेट आहे.मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे ह्या सध्या परदेश दौ-यावर असल्यामुळे सहज सुचलंच्या एका कार्यक्रमाची जबाबदारी किरण साळवी यांच्यावर सोपविलेली असून त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज साळवी यांनी रंज्जू मोडक यांची भेट घेतल्याचे राजूराच्या सहज सुचलंच्या जेष्ठ मार्गदर्शिका अधिवक्ता मेघा धोटे यांनी सांगितले.सध्या त्या दोघींही आगामी एका कार्यक्रमाचे नियोजन करीत असल्याच्या त्या म्हणाल्या.