Home Breaking News #Varora आनंद निकेतन महाविद्यालयात “संविधान दिवस” साजरा

#Varora आनंद निकेतन महाविद्यालयात “संविधान दिवस” साजरा

202

#Varora आनंद निकेतन महाविद्यालयात
“संविधान दिवस” साजरा

सुवर्ण भारत : ग्यानीवंत गेडाम (संपादक)

वरोरा : आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन,वरोरा येथे २६ नोव्हेंबर ” भारतीय संविधान दिवस ” उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून घनश्याम आवारी यांनी उपस्थित राहून भारतीय संविधानातील मूल्ये व लोकशाहीचे चार स्तंभ याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.आपल्या प्रभावी भाषणात आवारी यांनी संविधानाच्या निर्मितीपासून ते आजच्या समाजजीवनातील त्याच्या उपयुक्ततेपर्यंत विविध मुद्द्यांची मांडणी केली. संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्ये प्रत्येक नागरिकासाठी मार्गदर्शक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच विधिमंडळ, कार्यपालिका, न्यायपालिका आणि प्रसारमाध्यमे हे लोकशाहीचे चार स्तंभ सक्षम राहिल्यास राष्ट्र अधिक बळकट होते, असेही त्यांनी अधोरेखित केले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. मृणाल काळे यांनी भूषविले. त्यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी संविधानातील तत्त्वे जीवनात अवलंबणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाला उपप्राचार्य प्रा. राधा सवाने, नीरज आत्राम,प्रफुल ढोके, मनोज निब्रड, परमानंद तिराणिक यांची प्रमुख उपस्थिती लाभली. सर्व मान्यवरांनी संविधान दिवस साजरा करण्यामागील उद्दिष्टाशी विद्यार्थ्यांनी निष्ठा बाळगावी आणि आपले कर्तव्य बजावावे असा संदेश दिला.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतीय लोकशाहीबद्दलची बांधिलकी व्यक्त केली. कार्यक्रमाचे संयोजन राष्ट्रीय सेवा योजना +२ विभागाने केले. महाविद्यालयात संविधान दिनाचे औचित्य साधून विविध शैक्षणिक आणि जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये आचार्य परमानंद तिराणिक यांनी पोस्ट कार्डवर स्वहस्त लिखित संविधानाची उद्देशिका सर्व विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आली व त्याचे सामूहिक वाचन करण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नीरज आत्राम ( राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी ) यांनी केले, विद्यार्थ्यांमधून संविधान दिनानिमित्त कु. मुक्तेश्वरी नेहारे व कु. प्रतीक्षा ढोले यांनी आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन खुशाल शेरकी यांनी केले. तर आभार प्रदर्शन कु. इच्छा टिपले हिने केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांचा मोठ्या संख्येने उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.