#Ballarpur
• संविधान सन्मान दिनानिमित्त ब्लू वॉरियर्सतर्फे भव्य सामूहिक संविधान वाचन कार्यक्रमाचे आयोजन
बल्लारपूर : नवीन देहली संविधान सन्मान दिनाचे औचित्य साधत ब्लू वॉरियर्सतर्फे सामूहिक संविधान वाचनाचा भव्य व प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. भारतीय संविधानाचे महत्व, त्यातील मूलभूत अधिकार व कर्तव्यांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून संविधान मूल्यांची दृढ जाण निर्माण करण्याच्या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमाला ब्लू वॉरियर्सचे समस्त कार्यकर्ते, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवीन दैली येथील विद्यार्थी–विद्यार्थिनी, शिक्षकवर्ग तसेच परिसरातील सर्व गावकरी बांधव यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सामूहिक सहभागामुळे कार्यक्रम अधिक ऊर्जावान व यशस्वी झाला.
कार्यक्रमाला प्रतिष्ठित मान्यवरांची उपस्थिती लाभली. त्यामध्ये
अमिश मेश्राम, अंकुश जीवने, विलास माउलीकर, सुमित घोरघाटे, युवराज निरंजने, रितिक गोरघाटे, अमित मून, विनोद भडके, सारिपुत्र निरंजने व राकेश निरंजने – या मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला प्रेरणादायी स्वरूप दिले.
सर्वांच्या समन्वयातून व शिस्तबद्ध सहभागातून कार्यक्रम अत्यंत शांत, आदर्शवत आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. संविधानातील समानता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचा संदेश गावागावात पोहोचवण्यास ब्लू वॉरियर्सच्या या उपक्रमाने महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
संविधानाविषयी जागरूकता वाढविण्याच्या दिशेने हा उपक्रम निश्चितच समाजासाठी एक सकारात्मक आणि अनुकरणीय संदेश देणारा ठरला.

