
#Chandrapur
• CITU च्या राज्य अधिवेशनात अरुण भेलके यांची जनरल कौन्सील सदस्यपदी निवड
सुवर्ण भारत:किरण घाटे
विदर्भ विशेष प्रतिनिधी
सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (CITU) / भारतीय ट्रेड युनियन केंद्राचे १७ वे राज्य अधिवेशन नुकतेच मुंबई येथील आदर्श विद्यालय, टिळक नगर येथे उत्साहात पार पडले. तीन दिवस चाललेल्या या अधिवेशनाला CITU च्या राष्ट्रीय अध्यक्षा कॉ. हेमलता, महासचिव कॉ. तपन सेन तसेच राज्याध्यक्ष कॉ. डॉ. डी. एल. कराड यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या अधिवेशनात महाराष्ट्रभरातून सुमारे ३८० प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला.
‘कामगार वर्गीय अस्मिता निर्माण करा!’ आणि
‘चार श्रम संहिता रद्द करा!’
हे नारे अधिवेशनात ठळकपणे बुलंद करण्यात आले.
अधिवेशनात संघटनेची नूतन राज्य कमिटी जाहीर करण्यात आली. यामध्ये CITU राज्य जनरल कौन्सील सदस्य म्हणून चंद्रपूर येथील कामगार नेते कॉ. अरुण भेलके यांची निवड करण्यात आली. तसेच विशेष निमंत्रक म्हणून कॉ. प्रा. रमेशचंद्र दहिवडे, तर अंगणवाडी संघटनेतून कॉ. शारदा लेनगुरे व कॉ. सुनंदा बावणे यांची नियुक्ती करण्यात आली.
कॉ. अरुण भेलके यांच्या निवडीबद्दल चंद्रपूर जिल्ह्यातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन व्यक्त केले. यामध्ये संघटनेचे कामगार व कर्मचारी पदाधिकारी कॉ. राजेश पिंजरकर, आशा संघटनेच्या सायली बावणे, CTPS चे वामन मानकर, कोलमाइन्सचे कैलास रोडे, शेतमजूर संघटनेचे मारोती किन्नाके, बांधकाम कामगार संघटनेचे कॉ. प्रमोद गोडघाटे, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे संतोष धोटे व शरद ताजने यांचा समावेश आहे.
कॉ. अरुण भेलके यांच्या निवडीमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील कामगार चळवळीला नवी ऊर्जा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
