आत्मविश्वास
आज परत एकदा तिचे माझे भांडण झाले..
तिने माझ्यासाठी दुःख लिहिले,
त्या दुःखातही मी सुख पाहिले..
तिने माझ्यासाठी अश्रू लिहिले,
मी अश्रू पुसून पुन्हा हसले..
तिने मला काळोख दिला,
मी दिवा लावून उजेड केला..
तिने माझ्यासाठी मृत्यू लिहिला,
मृत्यूशी झुंज देऊन मी पुन्हा जगले….
माझी परीक्षा घेऊन ती थकली,
आणि स्वतःची ओळख दिली.
” मी नियती ” ती म्हणाली,
माझ्याकडे बघून गोड हसली,
मला विचारलं,
” कुठल्या दगडाची आहेस तू बनली ?
कठीण परिस्थितीत कशी काय जगली ?”
मी म्हणाली, ” अगं तुझीच मी सावली, तुझ्याकडूनच सारं काही शिकली. ”
मी अंतर्मनातला आत्मविश्वास जागवला….
आणि आज नियती पुन्हा हरली….
प्रा. ज्योत्स्ना प्रमोद वसाके, चंद्रपूर.
98 90 25 73 80





