सहज नव्हते.
*मेघातील दुग्ध शितल**
थंडगार हवेच्या श्रोतात
तेव्हा तीला आपलंसं करुन गेले…
स्वप्नांच्या बगंले रचत होती,
आयुष्याच्या नव्या कोऱ्या पानांवर
ते ठसे उमटत होते —
त्या विश्वासाचं,
अल्लड अवखळ वार्यावर कस्तुरी दरवळावी
त्या प्रमाणे…
पण…
उंबरठ्याच्या टप्प्यावर
पतंगाचा तुटलेला दोर,
कधी न सापडणारा धागा,
व कधी न भेटणारा पतंग —
ती एकटीच सावरत होती
त्या खोलवर गेलेल्या भेगांना…
त्या भेगांना अविश्वासाच्या…
सहज नव्हते ते सावरणे,
तीसाठी —
आतल्या वादळाला किनार्यावर आणणे,
स्वतःला सिध्द करणे —
त्या अविश्वासाच्या वाटेवरचे काटे सावरतांना,
आणि नव्याने आयुष्य फुलवतांना…
⬛प्रतिभा केदार पवार
बहादरपूर, जळगाव





