• मित्रपक्षांनी आमच्या उमेदवारांना चंद्रपूर मनपा निवडणुकीत जागा दिल्या नाही तर आम्ही स्वबळावर निवडणूक लढविणार- गौतम तोडे व अशोक घोटेकर यांचे मत
चंद्रपूर – किरण घाटे
चंद्रपूर मनपाची निवडणूक येत्या १५जा
नेवारीला होवून घातली आहे.
या निवडणूकीत मित्र पक्ष म्हणून भाजपनी आमच्या निष्ठावंत उमेदवारांना शहरातील काही प्रभागात उमेदवारी न दिल्यास आम्ही स्वबळाळावर मनपाच्या निवडणूक लढवू असे स्पष्ट मत आरपीआय आठवले पार्टीचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष गौतम तोडे व अशोक घोटेकर यांनी काल या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.
याच अनुषंगाने त्यांनी चंद्रपूर येथील श्रमिक पत्रकार भवनात काल एक पत्रकार परिषद घेतली.
या पत्रकार परिषदेला आरपीआयचे आठवले पार्टीचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष गौतम तोडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष जयप्रकाश कांबळे,तालूका सचिव हंसराज वनकर, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष किरण गेडाम,शहर अध्यक्ष राजू भगत ,शहर महिला अध्यक्ष अश्विनी रायपूरे,शहर महासचिव संदीप जंगम ,राजकूमार खोब्रागडे,बाळू आंबेकर सुप्रशिल गेडाम आदिं उपस्थित होते.
आरपीआयच्या जिल्हा बैठकीत हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला असल्याचे जिल्हाध्यक्ष गौतम तोडे यांनी सांगितले.





