
#varora
• आनंद निकेतनच्या विद्यार्थ्यांकडून आकर्षक शुभेच्छा पत्रांची निर्मिती
सुवर्ण भारत: खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनिधी, वरोरा
वरोरा : नाताळ व नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते. या आनंदोत्सवाला साजेसे शुभेच्छा पत्र तयार करण्याचे महत्त्व लक्षात घेऊन आनंद निकेतन महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी शुभेच्छा पत्र निर्मिती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
या स्पर्धेत विशेषतः पेपर कोलाज या कला प्रकारावर भर देण्यात आला. सांस्कृतिक विभाग प्रमुख चिटणीस मॅडम व लांजेवार मॅडम यांच्या मार्गदर्शन व विशेष परिश्रमातून सुमारे ६५ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी नाताळ व नववर्षाच्या शुभेच्छा देणारी अत्यंत कल्पक, आकर्षक व सुंदर शुभेच्छा पत्रे सादर केली.
स्पर्धेचे परीक्षण लता आत्राम मॅडम व गौरव चौधरी सर यांनी केले. स्पर्धेत प्रथम क्रमांक कु. साधना केवट, द्वितीय क्रमांक कु. रिया भक्ता तर तृतीय क्रमांक कु. साक्षी डोये यांनी पटकाविला. तसेच कु. वैष्णवी गुंतीवर व रिधिमा पुसाटे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य डॉ. काळे सर, उपप्राचार्य राधा सवाने, पर्यवेक्षक वरुटकर सर तसेच सर्व शिक्षकवृंदांचे मोलाचे सहकार्य लाभले.




