Home Breaking News • लोककलावंतांची आढावा बैठक संपन्न ! चंद्रपूरच्या सारिका उराडेंची उपस्थिती!

• लोककलावंतांची आढावा बैठक संपन्न ! चंद्रपूरच्या सारिका उराडेंची उपस्थिती!

80

• लोककलावंतांची आढावा बैठक संपन्न !
चंद्रपूरच्या सारिका उराडेंची उपस्थिती!

चंद्रपूर -किरण घाटे

सांगली जिल्ह्यातील कवलापूर गावात लोककलावंतची एक आढावा बैठक नुकतीच संपन्न झाली. त्या बैठकीला अखिल भारतीय लोककलावंत समितीच्या अध्यक्ष सारिका उराडे व समितीच्या सचिव कोमल पारोधी ह्या उपस्थित होत्या.
झाडीपट्टी मध्ये नावाजलेल्या मिस टिना उराडे यांची देखील उपस्थीती लाभली होती. बैठकीला पाच पिढ्यांपासून लोककला तमाशा जिवंत ठेवणारे ज्येष्ठ कलावंत खाडे व पुण्याहून बालगंधर्व मिठू दादा या सभेला आवर्जून उपस्थित होते. सदरहू बैठकीचे आयोजन सांगली जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील यांनी केले होते बैठकीचे सूत्रसंचालन कुमार वाघमारे यांनी केले. आयोजित बैठकीत कलावंतांच्या समस्या विषयी सर्वांशी सविस्तर चर्चा करण्यात आली .
कलावंतांच्या खचलेल्या मनाला जागृत करून आपल्या हक्कासाठी लढण्याची ताकद समितीच्या बळावर निर्माण करून आपले हक्क मिळवून घेऊ,असे सारिका उराडे यांनी या बैठकीत सांगितले.
त्यानंतर याच बैठकीत सांगली जिल्ह्याची शाखा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
बैठकीला लोककलावंत मोठ्या संख्येंने उपस्थित होते.