#Bhadravti
• आदिवासी काँग्रेसच्या प्रदेश सहसचिव पदी नियुक्तीबद्दल केशव तिराणिक यांचेसह नवनिर्वाचित आदिवासी नगर सेवकांचा सत्कार सोहळा संपन्न

तालुका प्रतिनिधी : राजेश येसेकर
भद्रावती : — येथील अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली महाराष्ट्र राज्य प्रदेश महासचिव आदिवासी सेवक केशव तिराणिक यांची आदिवासी काँग्रेसच्या प्रदेश सहसचिव पदी नियुक्तीबद्दल आणि भद्रावती नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत अनुसूचित जमाती प्रभाग क्र.10 मधुन विजयश्री प्राप्त करणाऱ्या शिंदे शिवसेनेच्या नगर सेविका सौ.शिलाताई संजय कुळमेथे तर, अ.जमाती सामान्य प्रभाग क्र.14 मधुन निवडून आलेले काँग्रेसचे प्रथम संदेश गेडाम या दोन्ही आदिवासी नगर सेवकांचा देखिल अखिल भारतीय आदिवासी परिषद नवी दिल्लीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य तथा सत्कार सोहळ्याचे अध्यक्ष जनार्दनजी पंधरे यांचे शुभ हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
दिनांक 7 जानेवारी 2026 रोजी आदिवासी सेवक केशव तिराणिक यांना 60 वर्षे पुर्णत्वाच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे औचित्य साधून चंद्रपूर केशवा डेव्हलपर्सचे संचालक तथा अभाआविपचे विदर्भ सचिव रविंद्र मेश्राम,चंद्रपूर रियल इस्टेटचे संचालक श्याम इंगळे,आणि इनफिनिटी रीयल इस्टेट अन इंन्फा संचालक सौ.मनिषाताई मेंढे यांचे संयुक्त विद्यमाने सुनील ऑटो मोबाईल्स भद्रावती येथे सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून अभाआविपचे प्रदेश सचिव सर्वश्री विवेक नागभिरे,विदर्भ महासचिव मधुकर कोटनाके ,चंद्रपूर जिल्हा जेष्ठ महासचिव माजी प्राचार्य परशुराम उईके,नागभीड तालुका अध्यक्ष आदिवासी सेवक दयाराम कन्नाके,प्रदेश सहसचिव लोकशाहीर बाबुराव जुमनाके,विदर्भ सचिव विठ्ठल कोडापे ,चंद्रपूर जिल्हाकार्याध्यक्ष आनंद तिराणकर,चंद्रपूर नगर शहर अध्यक्ष अरविंद परचाके,चंद्रपूर जिल्हा महिलाअध्यक्ष गिता सलामे ,जिल्हा महिला उपाध्यक्ष पुष्पाताई सिडाम, जिल्हायुवाध्यक्ष अतुल कोडापे, उपाध्यक्ष मधुकर टेकाम,तर राजुरा तालुका पदाधिकारी अध्यक्ष मनोज आत्राम, उपाध्यक्ष मुर्लीधर मेश्राम,सहसचिव बाळकृष्ण मेश्राम आदिंची प्रामुख्याने उपस्थिती होती.
याप्रसंगी भद्रावती ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना वैद्यकीय अधीक्षक डॉ.मनिषकुमार सिंग डाॅ. नितीन सातभाई यांचे उपस्थितीत फळांचे वाटप करण्यात आले.यासंचालन विद्याताई किन्नाके तर आभार प्रदर्शन बाबुराव जुमनाके यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृणाल तिराणिक, संकेत कोवे ,पियुष तिराणिक विजय तोडकर,भारती मडावी,विठ्ठल मेश्राम ,भास्कर मेश्राम,साईनाथ कुमरे,दिनेश कुमरे,निता आत्राम आदिनी विशेष परिश्रम घेतले.




