प्रख्यात चित्रकार नुपूर मोडक यांनी सहज सुचलं कलाकुंजचे नाव रोशन केले – दत्तात्रय समर्थ
चंद्रपूर: किरण घाटे

चंद्रपूरच्या प्रख्यात चित्रकार नुपूर दिलीप मोडक यांनी मुंबईत भव्य कला प्रदर्शनात सन्मान पुरस्कार मिळवून स्वता सोबत महाराष्ट्रातील
नामवंत सहज सुचलं कलाकुंजचे
नाव रोशन केले आहे असे मत मुलचे सुपरिचित समाजसेवक दत्तात्रय समर्थ यांनी आज बोलताना व्यक्त केले.
त्यांनी या सन्मान पुरस्कारासाठी नुपूर मोडक यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी तिला शुभेच्छा देखील प्रदान केल्या आहेत.
किनवटच्या सुपरिचित आर्टिस्ट साक्षी वाडगूरे यांच्या मनोवेधक कलेचे सुध्दा दत्तात्रय समर्थ व अर्चना समर्थ यांनी कौतुक केले आहे.विशेष म्हणजे नुपूर मोडक व साक्षी वाडगूरे ह्या महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं कलाकुंजच्या सदस्या आहेत.






