Home Breaking News चामोर्शीच्या प्रा. सुनंदा पाटील यांना सर्वद फौंडेशनचा स्टार साहित्यिक पुरस्कार प्राप्त

चामोर्शीच्या प्रा. सुनंदा पाटील यांना सर्वद फौंडेशनचा स्टार साहित्यिक पुरस्कार प्राप्त

10

चामोर्शीच्या प्रा. सुनंदा पाटील यांना सर्वद फौंडेशनचा स्टार साहित्यिक पुरस्कार प्राप्त

चंद्रपूर -किरण घाटे

चामोर्शी येथील स्व. बाळासाहेब दीक्षित यांची कन्या प्रा. सुनंदा गिरीश पाटील यांना सर्वद फौंडेशन मुंबई चा सन्मानजनक असा “स्टार लेखिका पुरस्कार ” बोरिवली पश्चिम मुंबई येथे प्रदान करण्यात आला .

याप्रसंगी सर्वद फौंडेशनच्या डॉ. सुचिता पाटील सह सुप्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक अरुण नलावडे , डॉ. चंद्रशेखर देशमुख , डॉ. मोहन सालेकर , मिलिंद भोसुरे अशी दिग्गज मंडळी उपस्थित होती. उपवस्त्र , सन्मानपत्र , सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. समाजातील काही नामवंत व्यक्तींची निवड करून हे पुरस्कार देण्यात आले.

प्रा. सुनंदा पाटील या ज्येष्ठ साहित्यिक आहेत . कवयित्री , गझलकार , कथालेखिका , कादंबरीकार म्हणूनही त्या परिचित आहेत . गझलनंदा या नावाने त्या गेली ५० वर्षे गझललेखनाचे कार्य करीत आहेत .
कवितेच्या अनेक लयबद्ध / वृत्तबद्ध प्रकारात त्या कविता लेखन करतात . तसेच लेखनाच्या कार्यशाळाही घेतात . साहित्यक्षेत्रात आजवर अनेक पुरस्कारांनी त्या सन्मानीत झालेल्या आहेत . सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे .