Home Breaking News बीट स्तरीय बाल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा संपन्न!

बीट स्तरीय बाल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा संपन्न!

48
Oplus_16908288

बीट स्तरीय बाल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा संपन्न!

सिंदेवाही – प्रतिनिधी

बीट स्तरीय बाल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा, बीट मोहाळी, पं. स. सिंदेवाही, जिल्हा परिषद चंद्रपूर
यांच्या विद्यमाने सिरकाडा येथे पार पडलेल्या स्पर्धेत जामसाळा (जुना) या शाळेने वैयक्तिकरित्या नृत्य कलेत प्रथम, फॅन्सी ड्रेसमध्ये प्रथम,नकलात प्रथम , सामुहिक नृत्यात प्रथम क्रमांक व मुली कबड्डी मध्ये प्रथम क्रमांक, मुले कबड्डी मध्ये द्वितीय क्रमांक, उंच उडी मध्ये मुली प्रथम क्रमांक, 100मीटर व 200 मीटर धावणे मध्ये मुली द्वितीय क्रमांक असे घवघवीत यश संपादन करीत सांस्कृतिक चॅम्पियन प्रथम व जनरल चॅम्पियन मध्ये द्वितीय क्रमांक पटकावला.मुख्याध्यापक तानाजी अल्लीवार, रविंद्र धारणे तसेच कु. पल्लवी गायकवाड व शिक्षण प्रेमी यांच्या मार्गदर्शनात मुलांनी हे यश संपादित केले आहे. त्या बद्दल गावात त्यांचे सर्वत्र अभिनंदन केल्या जात आहेत.