भद्रावती पोलिसांनी हरवीलेले मोबाईल हस्तगत करून तक्रारदारांना केले परत
तालुका प्रतिनिधी : राजेश येसेकर
भद्रावती : पोलिस स्टेशन भद्रावती येथील पोलिस निरीक्षक योगेश्वर पारधी व सपोनि वीरेंद्र केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली नापोअं भारत पुसांडे यांनी केलेल्या विशेष मोहिमेत नागरिकांचे चोरीला गेलेले. एकूण पाच मोबाईल फोन हरविलेले यशस्वीरित्या हस्तगत केले.या मोबाईल फोनची अंदाजित किंमत सुमारे 70,000 इतकी आहे.
सदर तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारावर ही मोहीम राबवली. नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींचा पाठपुरावा करत, विविध ठिकाणांवरून हे मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले.
दि. 12/01/2026 रोजी आयोजित एका कार्यक्रमात, हस्तगत केलेले सर्व पाचही मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले.
यावेळी पोलील निरीक्षक योगेश्वर पारधी यांनी नागरिकांना त्यांच्या मोबाईलची काळजी घेण्याबद्दल आणि मोबाईल चोरीला गेल्यास किंवा हरवील्यास त्वरित पोलिसांकडे तक्रार नोंदवण्याबद्दल आवाहन केले.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल भद्रावती पोलीस स्टेशन यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.



