हिंगणा येथे समता सैनिक दला तर्फे अन्नुताई खोब्रागडे यांचा जाहीर सत्कार…
तालुका प्रतिनिधी : राजेश येसेकर
भद्रावती : दिनांक 12/जानेवारी/2026 रोजी, नागपूर -हींगणा येथे समता सैनिक दला तर्फे राजमाता ,राष्ट्रमाता जिजाऊ जयंती, तसेच क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले जयंती, तसेच मुक्ताताई साळवे जयंती, तसेच फातीमा शेख,जयंती यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्ताने , चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील रणरागिणी आयु अन्नुताई विनोद खोब्रागडे सामाजिक कार्यकर्ते यांच्या शाल,सन्मानपत्र, तसेच सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती आयु अन्नुताई विनोद खोब्रागडे यांनी चालु घडामोडी वर आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला प्रबोधनकार संविधान शेंडे सह निशाताई धोंगडे चंद्रपूर यांच्या प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे उद्घाटन विनोद खोब्रागडे कायद्याचे विद्यार्थी तथा भारतीय संविधानाचे अभ्यासक तथा सामाजिक कार्यकर्ते वरोरा जिल्हा चंद्रपूर यांनी केले सर्व समाजातील महापुरुषांना, जाती जातीत वाटुन न घेता त्यांचे विचार आत्मसात करावे,याच उद्देशाने समता सैनिक दलाने हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल समता सैनिक दलाचे अनुयायी उपस्थित होते.

