Home Breaking News पेट्रोल पंपाशी संबंधित ट्रान्सपोर्ट धारकांना डिझेल विक्री!

पेट्रोल पंपाशी संबंधित ट्रान्सपोर्ट धारकांना डिझेल विक्री!

8

पेट्रोल पंपाशी संबंधित ट्रान्सपोर्ट धारकांना डिझेल विक्री!

घुग्घूस :- पेट्रोल पंपाशी संबंधित असलेल्या ट्रान्सपोर्ट धारकांना डिझेल विक्री करीत असल्याची चर्चा बाहेर राज्यातील येणाऱ्या ट्रक चालकामध्ये होत आहे. बाहेर राज्यातून येणाऱ्या ट्रकचे कधी कधी डिझेल संपते यामुळे ते आपले वाहन पेट्रोल पंपावर लावतात परंतु पेट्रोल पंपावर काम करणारे कामगार पेट्रोल संचालक यांच्या आदेशा वरून पेट्रोल, डिझेल संपल्याचे सांगते नंतर पेट्रोल पंपावरून वाहन गेल्यावर संबधित ट्रान्सपोर्ट धारकांना तोंड पाहून पेट्रोल व डिझेल विक्री’ (म्हणजेच ओळखीच्या किंवा विशिष्ट लोकांनाच इंधन देणे आणि इतरांना नाही) ही इंधनाचा तुटवडा असताना किंवा काळाबाजार होत असताना घडणारी परिस्थिती आहे. घुग्घूस मध्ये काही पेट्रोल पंपावर इंधनाचा साठा असूनही पेट्रोल पंपचालकांकडून असा भेदभाव केल्याच्या तक्रारी समोर आल्या आहे.तरी सर्व पेट्रोल पंपचालकांनी स्टॉक मालाचे फलक लावावे व याकडे जिल्हाधिकारी कार्यालय स्थानिक जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी लक्ष द्यावे अशी मागणी ग्राहकांनकडून केली जात आहे.