#Ballarpur
• श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लबतर्फे मकर संक्रांती उत्साहात साजरी
सुवर्ण भारत: सुवर्ण भारत
बल्लारपूर : बल्लारपूर शहरात सामाजिक बांधिलकी जपणारी व जनसेवेला सर्वोच्च मानणारी श्री. सुधीर भाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब, बल्लारपूर या संस्थेच्या वतीने मकर संक्रांतीच्या पावन पर्वानिमित्त एक सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या शुभ दिवशी महाराणा प्रताप वार्ड व दादाभाई नौरोजी वार्ड, बल्लारपूर येथील लहान चिमुकल्या मुलांना पतंगांचे वाटप करण्यात आले.
मकर संक्रांती हा सण आनंद, उत्साह आणि एकोप्याचे प्रतीक आहे. या सणाचे औचित्य साधून संस्थेने मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचा प्रयत्न केला. पतंग हातात घेताच मुलांचा आनंद ओसंडून वाहत होता. मुलांनी पतंग उडवण्याचा आनंद घेत सणाचा मनमुराद आनंद लुटला. वार्डातील लहान मुलांचा आनंद पाहून उपस्थित सर्व कार्यकर्त्यांच्या मनाला विशेष समाधान आणि आनंद मिळाला.
या उपक्रमातून सामाजिक जाणीव जोपासण्यासोबतच लहान मुलांमध्ये सणांचे महत्त्व आणि संस्कृतीची ओळख निर्माण करण्याचा हेतू संस्थेने साध्य केला. लहान मुलांसोबत मकर संक्रांतीचा पावन सण अत्यंत आनंदी, उत्साही आणि कौटुंबिक वातावरणात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत आंबेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच अभिषेक इधनुरी, सुदर्शन मादसवार, शुभम जंगम, तुषार तग्रम, बाबू सुद्धाला यांच्यासह संस्थेचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
श्री. सुधीर भाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब, बल्लारपूर ही संस्था सातत्याने सामाजिक, सांस्कृतिक व सेवाभावी उपक्रम राबवत असून भविष्यातही अशा उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत आनंद व मदतीचा हात पोहोचवण्याचा संकल्प संस्थेने व्यक्त केला.

