Home Breaking News #Gadchiroli • वीर बाबुराव सडमाके क्रीडा मंडळाच्या वतीने ग्रामीण व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन...

#Gadchiroli • वीर बाबुराव सडमाके क्रीडा मंडळाच्या वतीने ग्रामीण व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन • अजय कंकडालवार यांच्या हस्ते ग्रामीण व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन

83

#Gadchiroli
• वीर बाबुराव सडमाके क्रीडा मंडळाच्या वतीने ग्रामीण व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन

• अजय कंकडालवार यांच्या हस्ते ग्रामीण व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन

सुवर्ण भारत: शंकर महाकाली (संपादक)

चिरेपल्ली : चिरेपल्ली येथे वीर बाबुराव सडमाके क्रीडा मंडळ यांच्या वतीने भव्य ग्रामीण व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंना व्यासपीठ मिळावे तसेच क्रीडा संस्कृतीला चालना मिळावी या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तसेच अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार यांच्या शुभहस्ते पार पडले.

स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक काँग्रेस नेते अजय कंकडालवार यांच्याकडून देण्यात येणार आहे. द्वितीय पारितोषिक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव हनुमंनू मडावी व वनरक्षक अल्लापल्ली येथील कतलाम यांच्या वतीने देण्यात येणार असून, तृतीय पारितोषिक ग्रामपंचायत पेरमिलीचे सरपंच यांच्या कडून देण्यात येणार आहे.

या स्पर्धेमुळे परिसरातील तरुण खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, क्रीडा प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.