Home Breaking News प्रजासत्ताक दिनानिमित्त गोंडराजे किल्ल्यावर उपनगराध्यक्षांच्या हस्ते ध्वजारोहण

प्रजासत्ताक दिनानिमित्त गोंडराजे किल्ल्यावर उपनगराध्यक्षांच्या हस्ते ध्वजारोहण

44
Oplus_16908288

प्रजासत्ताक दिनानिमित्त गोंडराजे किल्ल्यावर उपनगराध्यक्षांच्या हस्ते ध्वजारोहण

सुवर्ण भारत:शंकर महाकाली

बल्लारपूर : बल्लारपूर शहराची शान असलेल्या ऐतिहासिक गोंडराजे किल्ल्यावर तब्बल चार वर्षांनंतर लोकप्रतिनिधीकडून राष्ट्रीय ध्वजारोहणाचा मान मिळाला. प्रजासत्ताक दिनानिमित्त मंगळवार, २६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.३५ वाजता उपनगराध्यक्ष देवेंद्र आर्य यांच्या हस्ते संपूर्ण राज्य सन्मानाने ध्वजारोहण पार पडले.

यापूर्वी १५ ऑगस्ट २०२१ रोजी दिवंगत माजी उपनगराध्यक्ष मीना चौधरी यांच्या हस्ते ऐतिहासिक गोंडराजे किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आले होते. त्यानंतर बल्लारपूर नगरपरिषदेत प्रशासक राजवट असल्याने गेल्या चार वर्षांत कोणत्याही लोकप्रतिनिधीकडून येथे ध्वजारोहण होऊ शकले नव्हते.

राज्य सरकारच्या नियमानुसार बल्लारपूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षांच्या हस्ते ऐतिहासिक गोंडराजे किल्ल्यावर ध्वजारोहण करण्याची परंपरा आहे. डिसेंबर २०२५ मध्ये नगरपरिषद निवडणुका पार पडून देवेंद्र आर्य यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ही परंपरा पुन्हा सुरू झाली. या ऐतिहासिक क्षणावेळी गोंडराजे बल्हारशाह यांच्या वारसांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाला नगराध्यक्षा अलका अनिल वाढई, मुख्याधिकारी विशाल वाघ, उपमुख्याधिकारी रवींद्र भंडारवार, संगीता उमरे, कार्यालयीन अधीक्षक नंदकिशोर सातपुते, माजी नगराध्यक्ष घनश्याम मूलचंदानी, स्थायी समिती सदस्य छाया मडावी व करुणा नरसिंग रेब्बावार, सभापती इस्माईल ढकवाला, प्रियंका थुलकर, पवन मेश्राम यांच्यासह नगरसेवक सुनील कुलदीवार, भास्कर माकोडे, रवी मातंगी, सिक्की यादव, मनोज बेले, सुमित डोहने, प्रणीत सातपुते, अविनाश मट्ठा, सलीम नबी तसेच नगरसेविका वैष्णवी जुमडे, शिल्पा चुटे, अंकुबाई भुक्या, मोना धानोरकर, वैशाली हुमणे, शारदा माकोडे, सुनीता जीवतोडे, रंजिता बीरे, काजल तोटावार उपस्थित होते.

याशिवाय नगरपरिषदेचे अधिकारी-कर्मचारी, पोलीस दल, पत्रकार बांधव व शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. चार वर्षांनंतर पुन्हा ऐतिहासिक किल्ल्यावर ध्वजारोहण झाल्याने नागरिकांत समाधान आणि आनंदाचे वातावरण होते.