Home Breaking News भव्य दिव्य महायज्ञ आयोजन सम्पन्न

भव्य दिव्य महायज्ञ आयोजन सम्पन्न

88

भव्य दिव्य महायज्ञ आयोजन सम्पन्न

वरोरा : श्रीराम मंदिर अयोध्येच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 22 जानेवारी 2026 रोज गुरुवारला सकाळी सात वाजता हनुमान मंदिर, द्वारका नगरी, बोर्डा,वरोरा येथे महायज्ञा चे आयोजन करण्यात आलेले होते. या महायज्ञ आयोजन कार्यक्रमाला परमपूज्य भागवत मनीषी संत श्री मनीष भाईजी महाराज यांचे मार्गदर्शन लाभले. या महायज्ञ आयोजनामध्ये 151 यज्ञकुंड अंतर्गत 551 साधक परिवारांनी सहभाग घेतलेला होता. या आयोजनाचा उद्देश 90 टक्के चिकित्सा यज्ञ आणि 10 टक्के अध्यात्म हे तत्व होते. या महायज्ञ आयोजना अंतर्गत दिनांक 20 -21 -22 जानेवारी ला सकाळी साडेपाच ते सात वाजेपर्यंत निशुल्क योग शिबिराचे आयोजन सुद्धा करण्यात आलेले होते. या महायज्ञ आयोजनाच्या यशस्वीते करता सर्वश्री टिपले, अनिवाळ,हजारे,गोल्हर,मिलमिले, जोगी, सावरकर, संचेती,भोयर,घुगल, जिवतोडे,बडवे, लांबट, डरे, डा.तेला,डॉक्टर डोरलीकर इत्यादींनी परिश्रम घेतले.