Home Breaking News विदर्भ किसान मजदूर काँग्रेसतर्फे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धा-सन्मान

विदर्भ किसान मजदूर काँग्रेसतर्फे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धा-सन्मान

125
Oplus_16908288

विदर्भ किसान मजदूर काँग्रेसतर्फे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धा-सन्मान

सुवर्ण भारत: शंकर महाकाली

चंद्रपूर :महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा कर्तव्यदक्ष, दूरदृष्टी असलेले आणि जनतेच्या मनात विशेष स्थान निर्माण करणारे नेते अजित पवार यांच्या प्रति विदर्भ किसान मजदूर काँग्रेसच्या वतीने भावपूर्ण श्रद्धा-सन्मान व्यक्त करण्यात आला. चंद्रपूर येथील गांधी चौकात आयोजित कार्यक्रमात दोन मिनिटांचे मौन पाळून त्यांच्या सार्वजनिक जीवनातील कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

यावेळी माजी खासदार नरेशबाबू पुगलिया यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “महाराष्ट्राच्या राजकारणात व प्रशासनात ठाम निर्णयक्षमता, विकासाभिमुख दृष्टिकोन आणि कार्यक्षम नेतृत्वाची ओळख असलेले अजितदादा पवार हे राज्यासाठी प्रेरणास्थान आहेत. जनतेच्या प्रश्नांशी थेट नाळ जोडून धाडसी निर्णय घेणारे नेतृत्व म्हणून त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे.”

पुगलिया पुढे म्हणाले की, ग्रामीण, शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य घटकांच्या हितासाठी अजित पवार यांनी घेतलेले निर्णय राज्याच्या विकासाला दिशा देणारे ठरले आहेत. त्यांच्या कार्यशैलीतून नव्या पिढीला सार्वजनिक जीवनातील जबाबदारीची जाणीव होते.

या श्रद्धा-सन्मान कार्यक्रमास विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचे जिल्हा महासचिव अशोक नागापूरे, शहराध्यक्ष देवेंद्र बेले, माजी नगरसेवक श्रीनिवास पारनंदी यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.