स्व.अजितदादा पवार यांना बल्लारपूर शहरात भावपूर्ण अभिवादन
सुवर्ण भारत:शंकर महाकाली
बल्लारपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या कार्याबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी बल्लारपूर शहरवासीयांच्या वतीने श्रद्धांजली व अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम बल्लारपूर शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, बल्लारपूर दिनांक 29 जानेवारी 2026 रोजी दुपारी 4 वाजता आयोजित करण्यात आला असून, या वेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्राच्या राजकारणात ठाम नेतृत्व, प्रशासनातील अनुभव आणि जनतेशी असलेली नाळ यामुळे अजितदादा पवार यांचे योगदान उल्लेखनीय असून, त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.
या कार्यक्रमास उपस्थित राहून नागरिकांनी अभिवादन करावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.



